‘लाव रे तो व्हिडीओ’च्या अफाट प्रसिद्धिनंतर स्वतःचे गाणे होणार रिलीज

विलास जोशी
Friday, 2 October 2020

विधानसभा निवडणुकीवेळी ‘लाव रे तो व्हिडीओ...’ हा डायलॉग फेमस झाला होता. त्‍याच धर्तीवर गाणे देखील निघाले होते. याच्या अफाट प्रसिद्धीनंतर वर्दीतील दर्दी कलाकार अर्धांगिनिच्या साथीने स्‍वतःचे गाणे रिलिज करत आहे.

वाकोद (ता. जामनेर) : नोकरी करताना आपली आवड जोपासणारे अनेक कलावंत आहेत. ही कला जोपासत सेलिब्रेटी देखील झाले आहेत. यातीलच एक असलेले पोलिस खात्‍यातील संघपाल तायडे. ड्युटीवर असताना त्‍यांनी गायलेले गाणे युट्यूब आणि फेसबुकवर प्रचंड चालले. आता स्‍वतः गायलेले आणि दिग्‍दर्शित गाणे देखील धूम करणार यात शंका नाही.

जळगाव पोलिस सेवेत असलेला संघपाल राजाराम तायडे नावाचा वर्दीतील दर्दी कलाकार की जो आपल्या ऐका व्हिडिओने सीक्रेट सुपरस्टार बनला. त्याच्या व्हिडीओला एक कोटींच्यावर व्हूव्ज मिळाले. त्याला आता साथ मिळाली आहे ती त्याची अर्धांगिनी भाग्यश्री तायडे हिची ती देखील कलाकार असल्याने दोघांची सारखी आवड ते मोठ्या उत्साहात जोपासत आहेत. त्यांच्या या जोडिने नुकतीच झी टीवी मराठी या चॅनेलवरील 'लाव रे तो विडियो' या कार्यक्रमात दोन वेळा येऊन अफाट प्रसिद्धि मिळवली. सोबतच ऐका भागामध्ये प्रथम क्रमांकांचे बक्षीस देखील मिळवले.

येणार नवीन अल्‍बम
सीक्रेट स्टार संघपाल तायडे व त्यांची पत्नी भाग्यश्री कमलेघ तायडे यांनी संघपाल तायडे दिग्दर्शित व स्वतः नृत्य साकारत असलेला 'लॉक डाउन सरल्यावर...' या एक अल्बम गीतांचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून त्याचा प्रोमो देखील रिलीज झाला आहे. पूर्ण गीत संघपाल तायडे या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.
 
जळगावच्या पोलिस खात्‍यात
जळगावच्या पोलिस खात्‍यात असलेल्‍या खाकी वर्दीतील पहिल्या दिग्दर्शकाची अदाकारी तसेच त्यांची पत्नी भाग्यश्री तायडे यांचा सुंदर अभिनय या माध्यमातून पाहायला मिळणार असून पोलिसातील हा दर्दी कलाकार आपल्या सुमधुर आवाजासोबतच नृत्य व दिग्दर्शन यातून दिसत असल्याने सर्वांना त्याच्या या पहिल्या गीताबद्दल उत्सुकता आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner police constebale sanghpal tayde singing song