ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यीक भालचंद्र नेमाडेंंवर जामनेरमध्ये गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

भालचंद्र नेमाडे यांना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणी राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

जळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक व साहित्यीक भालचंद नेमाडे यांच्या हिंदू : जगण्याची समृध्द अडगळ… या कादंबरीत कादंबरीत लमान गोरबंजारा समाजातील महिलांबाबत अपमानजनक लिखाण केल्याचा आरोपांवरून जामनेर पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा आज दाखल करण्यात आला. 

आवश्य वाचा- संविधान हे जनताभिमुख असून, जनताच सार्वभौम आहे
 

हिंदू कांदबरीतील लमान गोरबंजार समाजातील महिलांविषयी अपमानजणक लिखाण केल्याच्या आरोप डाॅ. भरत पवार यांनी पोलिसात तक्रारीत केला आहे. तक्रारीनुसार भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात जामनेर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ज्ञानपीठ पुरस्कार देखील परत घ्यावा 

भालचंद्र नेमाडे यांना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणी राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेरचे तहसीलदार तसचे जिल्हाधिकारी यांनी निवेदनातून केली आहे.

आवश्य वाचा- लालसरी बदकाला हतनूर जलाशयाचा मानपक्षी जाहीर करावा
 

'कोसला' कांदबरीतून प्रसिध्दी

भालचंद्र नेमाडे हे मूळ जळगाव जिल्ह्यातील सांगवी येथील रहिवासी आहेत. त्यांची पहिली कांदबरी ‘कोसला’ ला वाचकांची चांगली पसंती मिळाली आहे. त्यांना साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कारही प्राप्त झाला आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner police registered against literary bhalchandra nemade