चाकू घेवून तो पोलिसात आला...म्‍हणाला मी खुन केलाय

Murder
Murder
Updated on: 

जामनेर : तीन वर्षांपुर्वी लग्‍न झाले असताना पती- पत्‍नीमध्ये नेहमी वाद भांडण व्हायचे. म्‍हणून पत्‍नी कायम माहेर रहायची. पण आपल्‍या बहिणीला वागवत नाही म्‍हणून शालकाने प्लॅन आखत मेव्हण्याला रस्‍त्‍यावरच गाठले. त्‍याला ठार मारत रक्‍ताने माखलेला चाकू घेवून तो पोलिस स्‍टेशनला आला.


नेरी (ता. जामनेर) येथील माहेर असलेल्‍या विवाहितेचे तीन वर्षापुर्वी म्‍हणून २०१७ मध्ये गावापासून सात किमी अंतरावरील चिंचखेडा बु. या गावातील भागवत मोतीराम पारधी याच्याशी विवाह झाला होता. विवाह झाल्‍यानंतर काही दिवसच ती महिला सासरी राहिली. त्‍यानंतर काही दिवसातच ती माहेर आली. माहेरच्यांनी तिला पुन्हा सासरी पाठविले असता; पती- पत्‍नीमध्ये सातत्‍याने वाद होत रहायचे. यामुळे विवाहिता वारंवार माहेर येत असते. ही बाबत तिचा भाऊ परमेश्‍वर प्रकाश पारधी याला खटकत होती. यामुळे त्‍याचे मेहुणे भागवत पारधी यांच्याबद्दल त्‍याच्या मनात राग निर्माण झाला होता. यामुळे अद्दल घडवायची हे मनाशी ठरविले होते.

शक्‍कल लढवत गाठले रस्‍त्‍यावरच
नेरी आणि चिंचखेडा बु. या दोन्ही गावांमध्ये अवघे सात किमीचे अंतर आहे. शिवाय चिंचखेड्याहून जामनेरला जाण्यासाठी नेरी गावाहून जावे लागते. अशात आपल्या बहिणीला नांदवत नसल्याचा प्रचंड राग असलेल्या शालक परमेश्‍वर पारधी याने नामी शक्कल लढवुन मेव्हणा भागवत पारधी यास जामनेर- बोदवड रस्‍त्‍यावर लहासर गावाच्या फाट्यावर रस्‍त्‍यातच रोखले. माझ्या बहिणीला का वागवत नाहीस; म्‍हणत त्‍याने चाकून वार केले. यात भागवत पारधी याचा मृत्‍यू झाला.

चाकू घेवून तो पोलिसात आला
चाकूने वार करून मेव्हण्याचा खुन करून कायमचा काटा काढला. चाकून वार केल्‍यानंतर भागवत पारधी यास रस्‍त्‍यावर पडू देत घटनेतील संशयीत आरोपी परमेश्‍वर हा रक्‍ताने भरलेला चाकून घेवून स्वतःहुन पोलीस ठाण्यात आला आणि पोलिसांना म्‍हणाला मी माझ्या मेव्हण्याचा खुन केला अशी कबुली दिली. यानंतर पोलिस त्‍यास घटनास्‍थळा घेवून गेले; परंतु जोरदार पाऊस सुरू असल्‍याने पुर्ण तपास होवू शकलेला नव्हता.

संपादन : राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Crime News Newly Married Woman Accused in Poisoning Incident Involving Husband and Two Others in Jalgaon
Solapur Municipal Clerk Mouli Without Both Hands Performs Aarti In Inspiring Moment At Deepstambh Foundation Event
Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Marathi News Esakal
www.esakal.com