पोलिसांनी घेतले मनावर...वाळू माफियांविरोधी कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

गिरणा नदीपात्रात पावसाळ्यातही वाळूची लूट सुरु आहे.विशेष म्हणजे ही वाळू चोरी रोखण्याठी महसूल विभागाचे सातही दिवस दैनंदिन वाळू गस्ती पथक तैनात करण्यात आले आहे. तरीही वाळू चोरी सुरुच आहे.त्यामुळे ही वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीसांनीच आता कारवाईचा बडगा उगारला आहे.

मेहुणबारे (जळगाव) : पावसाळा सुरू होवून एक महिना झाला तरी तालुक्यात गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरीस सर्रास सुरु आहे. या वाळू माफियांच्या विरोधात आता मेहूणबारे पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने वाळु  माफियांनी चांगलाच धसका घेतला आहे. आज पहाटे पोलीसांनी कळमडू -कुंझर रसत्यावर एक व टाकळी प्र.दे. येथे एक असे देान वाळुचे ट्रॅ्क्टर पकडले. उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या आदेशान्वये सहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

हेपण वाचा - चोरटे आले..दारू प्यायले, चोरी नंतर दुकान पेटवून पसार झाले. 

गिरणा नदीपात्रात पावसाळ्यातही वाळूची लूट सुरु आहे.विशेष म्हणजे ही वाळू चोरी रोखण्याठी महसूल विभागाचे सातही दिवस दैनंदिन वाळू गस्ती पथक तैनात करण्यात आले आहे. तरीही वाळू चोरी सुरुच आहे.त्यामुळे ही वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीसांनीच आता कारवाईचा बडगा उगारला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या आदेशान्वये उपविभागीय कार्यालयातील इआरटी पथकातील मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे, कमलेश राजपूत, योगश बोडके, गोरख चकोर, नंदू निकम, श्री. देशमुख, संजय मोरे, दामु पाटील यांच्या पथकाने आज  (ता.4) रोजी पहाटे 2 ते 4 वाजेच्या सुमारास कुंझर- कळमडू दरम्यान गस्तीदरम्यान वाळूचे एक ट्रॅ्क्टर जप्त करून कारवाई केली. दुसरी कारवाई चाळीसगाव ते पिलखोड दरम्यान टाकळी प्र.दे. गावाजवळ केली. वाळू चोरी करणारे दोन्ही ट्रॅक्टर मेहूणबारे पोलीस ठाण्यात जमा केली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसाठी महसूल विभागाला पत्र पाठविले आहे.

सातत्य राखण्याची गरज
गिरणा नदीपात्रातून राजरोसपणे वाळू चोरी होत आहे. महसूल विभागाचे दैनंदिन गस्ती पथक कार्यरत असून देखील वाळू माफीया निडर झाले असून ते कुणालाच जुमानत नाही अशी स्थिती आहे. पोलीसांनी आज पहाटे केलेल्या दोन कारवायांमुळे वाळू माफियांमध्ये धडकी भरली असली तरी या कारवाईत सातत्य हवे अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mehunbare police action valu mafiya night