
पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की तरुणाचा जागीच मृत्यु झाला.धडक देणारा कार चालक अपघाताची खबर न देताच पळून गेला होता.
मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : पहाटेच्या वेळेस रस्त्याच्या कडेला रनिंग करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली.यात जबर मार लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यु झाला. धडक देणारा कार चालक अपघाताची खबर न देताच पळून गेला होता. त्यास अटक करण्यात आली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा- खोदकाम करतांना सापडली जूनी नाणी आणि गावात पसरली अफवा !
सध्या थंडीचे दिवस असल्याने नागरीक भल्या पहाटे मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत आहेत. शहरापासून काही अंतरावर असलेल्या ओझर येथील उदय सुनील पाटील (वय23) हा तरूण देखील आज शुक्रवार (ता.20 )रोजी पहाटे 6 वाजेच्या सुमारास भडगाव रोडवर डाव्या साईडने रनिंग करीत असतांना हॉटेल आदेशजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच.15डीसी.8926)या कारचालकाने उदय पाटील यास पाठीमागून जोरात धडक दिली.ही धडक इतकी जोरात होती की उदय पाटील याचा जागीच मृत्यु झाला.कारचालक अपघाताची माहिती न देता कार सोडून पळून गेला.
अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मनोज सिताराम पाटील रा. ओझर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच.15 डीसी.8926 या कारचालकाच्या (नाव गाव माहित नाही) विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार धर्मराज पाटील हे करीत आहेत.या दुर्देवी घटनेने ओझर गावात शोककळा पसरली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे