शेतकऱ्यांना मदत द्या,आमदार पाटीलांचे महसुल मंत्र्याना साकडे

Jalgaon Farmer News: पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे बळीराजावर पुन्हा तिसऱ्यांदा पेरणीचे संकट ओढवले आहे.
MLA Anil Patil
MLA Anil Patil
Summary

चालू वर्षाचा खरीप हंगाम कोलमडला असून, बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.


अमळनेर : जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा २५ टक्के देखील पाऊस झालेला नाही. पावसाने दडी मारल्यामुळे ६८ हजार ६८५ हेक्टर एवढ्या पेरणीयोग्य (Sowing) क्षेत्रापैकी ४३ हजार ८८८ हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्यात आली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजावर पुन्हा तिसऱ्यांदा पेरणीचे संकट (Sowing Crisis) ओढवले आहे. खानदेशात (Khandesh) असलेली दुष्काळाची भयानक दाहकता लक्षात घेता आमदार अनिल पाटील (MLA Anil Patil) यांनी मंगळवारी (ता. ३) तातडीने मुंबई गाठून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(Revenue Minister Balasaheb Thorat), कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse), मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar) यांची भेट घेऊन मतदारसंघातील पावसाअभावी पीडित झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

MLA Anil Patil
अनाथ बालकांना मदतीचा केवळ फार्स


अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७० मिलिमीटर आहे. चालू हंगामात जूनमध्ये ७६.६ मिलिमीटर व जुलै महिन्यामध्ये ९०.८ मिलिमीटर असे एकूण १६७.४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. अर्थात वार्षिक सरासरीच्या तुलनेत २५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे ६८ हजार ६८५ हेक्टर एवढ्या पेरणी योग्य क्षेत्रापैकी ४३ हजार ८८८ हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्यात आली आहे. पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे बळीराजावर पुन्हा तिसऱ्यांदा पेरणीचे संकट ओढवले आहे.


दुष्काळ जाहीर करावा
चालू वर्षाचा खरीप हंगाम कोलमडला असून, बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे तत्काळ पंचनामे करून अमळनेर विधानसभा मतदारसंघ ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये प्रमाणे सरसकट विनाअट सानुग्रह अनुदान जाहीर करावे, शेतीपंपाचे चालू वर्षाचे वीजबिल माफ करावे, तसेच चारा छावण्या सुरू करण्यात याव्या, या प्रमुख मागण्या मंजूर कराव्यात, अशी विनंती आमदारांनी कृषी, महसूल व मदत पुनर्वसन मंत्री यांच्याकडे केली.

MLA Anil Patil
जळगावात सक्रिय रुग्णसंख्या आता साठच्या घरात


खानदेशात असलेली दुष्काळाची भयानक दाहकता लक्षात आणून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही वेळ घेऊन भेट घेणार आहे. त्यांना देखील मतदारसंघातील दुष्काळाचा सविस्तर अहवाल देण्यात येईल.
- अनिल पाटील, आमदार, अमळनेर मतदारसंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com