आगीत भस्म झालेले स्टुडिओ माणुसकीतून उभा राहणार 

संदीप शिंपी
Thursday, 8 October 2020

गेल्या दोन आठवड्यापूर्वी होत्याचे नव्हते झाले. शॉर्टसर्किट की अन्य कारण यामुळे रात्रभरात अचानक लागलेल्या आगीत त्यांचे फोटो स्टुडिओ जळून पूर्णपणे बेचिराख झाले.

चांगदेव (ता. मुक्ताईनगर)  : ‘कृतज्ञता अबोल असते’ या उक्त भावनेतून शहरातील जुने गावात जळून बेचिराख झालेल्या फोटो स्टुडिओच्या संचालकास आलेल्या संकटावर मात करून व्यवसायाला नव्याने सुरवात करण्यासाठी ‘मुक्ताईनगर व्यापारी मंच’च्या सदस्यांनी कोरोनासारख्या संकटसमयी व डबघाईस आलेल्या व्यवसायाची चिंता बाजूला सारून स्वयंस्फूर्तीने व्यापारी वर्गाच्या लोकसहभागाचा जागर घडवून निर्माण झालेल्या मदत यज्ञातून सुमारे ३५ हजारांवर रोख मदत भिका यांच्या स्वाधीन केली .यामुळे मुक्ताईनगरात माणुसकी अनोखे दर्शन या मुक्ताईनगर व्यापारी मंचच्या माध्यमातून घडले आहे. 

आवश्य वाचा- जळगाव जिल्ह्याला कोरोनाचा पून्हा विळखा, बाधितांचा आकडा वाढला  
 

यंदा लॉकडाउनमुळे सर्वच व्यावसायिकांना प्रचंड फटका बसला. दैनंदिन व्यवहारावर उपजीविका भागविण्याऱ्या छोट्या व्यावसायिकांची तर प्रचंड उपासमार या काळात झाली व अजूनही जेमतेम परिस्थिती आहे. या परिस्थितीशी दोन हात करणारे मुक्ताईनगर शहरातील नंदकिशोर फोटो स्टुडिओचे संचालक भिका मुरलीधर महानुभाव हे येणाऱ्या प्रत्येक दिवशी चांगल्या व्यवसायाची आशा धरून होते. अशात गेल्या दोन आठवड्यापूर्वी होत्याचे नव्हते झाले. शॉर्टसर्किट की अन्य कारण यामुळे रात्रभरात अचानक लागलेल्या आगीत त्यांचे फोटो स्टुडिओ जळून पूर्णपणे बेचिराख झाले. या संकटाने ते फार हादरून गेले. 

आवर्जून वाचा-  ‘ट्रिपल टी’ त्रिसुत्रामूळे जळगाव जिल्ह्यात कोरोना ‘कंट्रोल’आला मध्ये 

व्हॉट्सॲप ग्रुपवर सकारात्मक चर्चा 
शहरातील व्यापारी वर्गाचा ‘मुक्ताईनगर व्यापारी मंच’ हा ग्रुप असून, यावर सर्व व्यापारी एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यानुसार याच ग्रुपवर नंदकिशोर फोटो स्टुडिओच्या नुकसानीचे फोटो शेअर झाल्याने कोणी त्यांना धीर दिला व अचानक आलेल्या संकटांशी लढण्यासाठी बळ मिळो, अशी आशा व्यक्त केली. यासह एक नवीन विचार देखील ग्रुपला शेअर झाला. त्यानुसार व्यापारी मंचच्या सदस्यांनी लोकसहभागाचा जागर घडवून सदर नुकसानग्रस्त व्यावसायिक बांधवाला मदतीचा ओघ देऊन पुन्हा उभारी देण्याचा माणस या संदेशात होता. तो सर्व सदस्यांना पटला व यावर अंबलबजावणी देखील झाली. आणि या अनोख्या संकल्पनेतून आज मुक्ताईनगर व्यापारी मंचतर्फे फुलनी फुलाची पाकळी स्वरूपात जमा झालेले सुमारे ३५ हजार २१४ रुपये रोख स्वरूपात नंदकिशोर फोटो स्टुडिओचे संचालक भिका मुरलीधर महानुभाव यांच्या स्वाधीन केले.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktaeenagar photo studio, which was gutted in the fire, will continue to flourish with the help of many