esakal | मुक्ताईनगरात भाजपची वाट खडतर
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

मुक्ताईनगर मतदार संघात भाजप रुजविण्यासाठी खडसेंनी सुरवातीच्या काळात प्रसंगी सायकलीवरून गावागावांत फिरून जनाधार वाढविला. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारख्या दिग्गज ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले.

मुक्ताईनगरात भाजपची वाट खडतर

sakal_logo
By
दीपक चौधरी

मुक्ताईनगर (जळगाव) : तालुक्यासह मतदारसंघात ४० वर्षांपूर्वी काँग्रेसची सत्ता असताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जिवाचे रान करून पक्षाला बळकटी दिली. तसेच सहकार क्षेत्रासह विविध संस्थांवर पकड मजबूत करीत आपले वेगळे वलय निर्माण केले. परंतु, न्यायासाठी स्वकियांशीच संघर्ष करावा लागल्यानंतर खडसेंनी राष्ट्रवादीचा मार्ग निवडल्याने जिल्ह्यातील विशेषत: मुक्ताईनगर मतदारसंघातील राजकारण ढवळून निघाले आहे. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर खडसेंचा प्रभाव असल्याने भाजपला अस्तित्वासाठी लढाई लढावी लागणार आहे. 

मुक्ताईनगर मतदार संघात भाजप रुजविण्यासाठी खडसेंनी सुरवातीच्या काळात प्रसंगी सायकलीवरून गावागावांत फिरून जनाधार वाढविला. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारख्या दिग्गज ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. सध्या मुक्ताईनगर मतदारसंघात सहकार क्षेत्र, भाजप मतदार संघातील बोदवड, मुक्ताईनगर व सावदा या तीनही नगरपरिषदा भाजपच्या ताब्यात आहे.

ग्रामपंचायतील वर्चस्‍वही ढासळणार
जिल्हा परिषदमध्ये सर्वांत जास्त जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य भाजपचे असून, मुक्ताईनगर मतदारसंघातील ७५ टक्के ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात असून, नाथाभाऊंच्या वर्चस्वाखालील आहेत. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसणार आहे. याचा प्रत्यय खडसे नाराज असताना भाजपच्या आंदोलनातील उपस्थितीवरून आला आहे. त्यामुळे येत्या काळात मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसण्याची संकेत आहेत. कमलेश पटेल

संपादन ः राजेश सोनवणे

loading image