भाजप कार्यालयाला लागले कुलूप; खडसेंच्या पक्षांतरानंतर मुक्‍ताईनगर येथील चित्र

दीपक चौधरी
Saturday, 24 October 2020

मुक्ताईनगर मतदार संघात खडसे यांना वैयक्तिक मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने खडसेंवर भाजपने केलेला अन्यायाच्या विरोधात खडसेंबरोबर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी दिली.

मुक्ताईनगर (जळगाव) : अगदी सकाळपासून कार्यकर्‍त्‍यांची वरदळ असलेले भाजप कार्यालय; आज अगदी सुनेसूने पाहण्यास मिळत आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर भाजपला उतरतीकडा लागल्याचे प्रत्यय जाणवू लागला आहे. मुक्‍ताईनगर येथील भाजप कार्यलयाला लागलेल्या कुलूपावरून हे दिसून येत आहे.

मतदार संघ गेल्या कित्येक दिवसांपासून नाराज खडसे प्रवेशाबाबत चर्चा होती. तसेच खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलेल्या प्रवेशानंतर मुक्ताईनगरमध्ये भाजप होणार परिणाम याबाबत जोरदार चर्चा होती. खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मुक्ताईनगरमधील भाजपाचे काय होईल? याबाबत चर्चा रंगत असताना मुक्ताईनगर शहरातील भाजपच्या अस्तित्व कमी झाल्याचे मोठे उदाहरण पाहण्यास मिळत आहे. दररोज सकाळपासून वर्दळ असलेल्या मुक्ताईनगर शहरातील भाजप कार्यालयाला लागलेले कुलूप सर्व बोलून जाते. 

कार्यालयात कोणी आलेच नाही
मुक्ताईनगर मतदार संघात खडसे यांना वैयक्तिक मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने खडसेंवर भाजपने केलेला अन्यायाच्या विरोधात खडसेंबरोबर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी दिली. यामुळे मुक्ताईनगर शहरात भाजप कार्यालय उघडण्यासाठी सुद्धा भाजपचा कार्यकर्ता उरला नसल्याचे चित्र आहे

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktainagar bjp office lock today in khadse rashtrawadi entry