मुलाच्या मृत्यूचा धक्का;आईनेही सोडले प्राण

Death
Death
Updated on


कुऱ्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) : येथून जवळच असलेल्या थेरोळा येथील तरुण मुलाच्या (Young Boy) अचानक झालेल्या मृत्यूच्या धक्क्याने दुसऱ्या दिवशी आईनेही प्राण (Mother Death) सोडला. या धक्कादायक घटनेमुळे गावासह पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Death
गुजरातच्या मोस्ट वॉंटेडला नवापूरमधून अटक; सुरत एटीएसची कारवाई


थेरोळा (ता. मुक्ताईनगर) येथील शेतमजुरी करणारा अत्यंत प्रामाणिक विजय जनार्दन पाटील (वाघमारे) (वय ३५) याचा सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास मेंदूतील नस चोकअप झाल्याने मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. मात्र, तरुण मुलाच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने आई सुभाबाई जनार्दन पाटील (वय ७०) यांचे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास निधन झाले. या घटनेमुळे थेराळा गावावर शोककळा पसरली आहे.
विजय पाटील हा दररोज शेतमजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करत होता. मात्र, त्याच्या झालेल्या दुर्दैवी मृत्युमुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्याला सहा वर्षांचा मुलगा आहे. विजय अत्यंत मनमिळाऊ व शांत स्वभावाचा होता.

Death
अंजनी प्रकल्पात 80 टक्के जलसाठा..सिंचनाची समस्या दूर


कुटुंबावर मोठे संकट
विजय व त्याची पत्नी अर्चना हे दोघे रोज सोबतच शेतमजुरी करून संसाराचा रहाटगाडा गुण्यागोविंदाने हाकत होते. दोन्ही जण आणि मुलगा अलोक त्यांच्या संसारात खूप आनंदी राहत असत. शेतकऱ्यांची कामे प्रामाणिकपणे करीत असत. मात्र, नियतीने वेगळा डाव साधून अचानक मेंदूतील वाहिनी बंद झाल्याने विजयचा मृत्यू ओढावला. त्यामुळे पत्नी अर्चनासह कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com