esakal | तर ‘विराट’चा जीवच गेला असता; गळ्यात अडकली होती डबी
sakal

बोलून बातमी शोधा

child

दहा वर्षाचा विराट बबन रायपुरे (रा.भानगुरा, ता. मुक्ताईनगर) या अवघ्या दहा महिने वयाच्या बालकाने शनिवारी सकाळी साडेआठला अंथरूणावर खेळता खेळता जवळ पडलेली वेदनाशामक बामची प्लॅस्टिकची डबी तोंडात घातली आणि ती गिळली गेली. त्‍याला बाहेर काढता न आल्‍याने बाटली गळ्यात जाऊन अडकली. यामुळे विराटचा आवाजही बंद झाला आणि श्‍वास घेता येत नसल्‍याने अत्‍यवस्‍थ झाला. 

तर ‘विराट’चा जीवच गेला असता; गळ्यात अडकली होती डबी

sakal_logo
By
दीपक चौधरी

मुक्ताईनगर (जळगाव) : अवघ्या दहा महिने वयाचा विराट घरात खेळत असताना त्‍याने वेदनाशामक मलम (बाम) प्लॅस्टिक डबी तोंडात घातली. ही बाटली गळ्यात अडकल्याने त्‍याची श्वसन नलिका दाबली गेली. यामुळे त्‍याला श्‍वास घेण्यास त्रास होवू लागला होता. सदरची बाब वेळीच लक्षात आल्‍याने विराटला अत्यवस्थ अवस्‍थेत रूग्‍णालयात नेले. शहरातील हृदयरोग व नाक, कान, घसातज्ज्ञ डॉ. एन. जी. मराठे यांनी जीवदान दिले.

रडण्यात डबी ओढली गेली आत
विराटच्या वयाच्या हिशोबाने अन्ननलिका बारीक आणि प्लॅस्टिकची डबी आकारात मोठी होती. यामुळे डबी अन्ननलिकेच्या तोंडावर, तर श्वसन नलिकेच्या बाजूने जाऊन अडकली. बालकाच्या रडण्यामुळे डबी अधिक आत ओढली गेली आणि श्वसन नलिका दाबली जाऊन विराट अत्यवस्थ होऊ लागला. अशा परिस्थितीत त्याला डॉ. एन. जी. मराठे यांच्याकडे आणण्यात आले. यावेळी श्वास कमी झाल्याने तो निळा पडू लागला होता. डॉक्टरांनी मोठ्या शिताफीने प्रसंगावधान राखत लहानग्या विराटच्या गळ्यातून प्लॅस्टिकची डबी काढली आणि विराटने मोकळा श्वास घेतला.

विराटच्या रडण्यासोबत आईचा देखील हांबरडा
थोडा वेळ देखील अधिक वाया गेला असता; तर श्वास थांबून विराटचा जीव गेला असता. वेळेवर डॉक्टर देवदूत म्हणून सापडले आणि डॉक्टरांच्या साक्षात देवरूपाने विराटला जीवदान मिळाले, अशी भावना या विराटच्या मातेने व्यक्त केली. भेदरलेल्या अवस्थेत असलेली त्याची आई आणि आजी सोबत मामाने विराटच्या गळ्यातून डबी काढली गेली आणि त्याने आवाज काढला. हे पाहून आनंदअश्रूंना वाट मोकळी करून दिली. डॉक्टरांचे साक्षात देव म्हणून त्यांनी आभार मानले.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top