पाचोऱयात आता सातच्या आत घरात; प्रशासनाकडून कठोर अमंलबजावणी 

पाचोऱयात आता सातच्या आत घरात; प्रशासनाकडून कठोर अमंलबजावणी 
Updated on

पाचोरा : येथील शहर व परिसरात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक कमी होत असली तरी शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठेत होणारी गर्दी मात्र कमी व्हायला तयार नाही .शासकीय सह खाजगी कोविंड सेंटर मधून उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही घटत असल्याने दिलासादायी वातावरण निर्माण झाले असले तरी संसर्गाची भीती विचारात घेता शासन व प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लागू करण्यात आलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून आता सातच्या आत घरात या नियम कठोर लागू केला जाणार आहे.

पाचोरा येथे मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह विविध सेवाभावी संस्था संघटनांचे पदाधिकारी कोरोना प्रतिबंधासाठी एकत्रित आल्याने कठोर नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली. लॉकडाउन सह स्वयंस्फूर्तीने तीन ते चार वेळा जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत पाचोर्‍याची रुग्णसंख्या शून्य झाली त्यामुळे पाचोरा कोरोना मुक्त झाल्याचा आनंद साऱ्यांनीच व्यक्त केला. परंतु तो आनंद क्षणिक ठरला. कारण लॉक डाऊन मध्ये शिथीलता देण्यात आल्याने काही व्यवसाय सुरू झाले त्यामुळे पोलीस, पालिका ,आरोग्य व महसूल विभागातर्फे होत असलेली प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी कमकुवत ठरली. त्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत जाऊन आजतागायत ही परिस्थिती कायम आहे.


रुग्ण संख्येचा आकडा तीन हजाराच्या उंबरठ्यावर असून स्थानिक पातळीवर उपचार व्हावेत म्हणून बांबरुड शिवारात शासकीय व ग्रामीण रुग्णालयात शासकीय कोविड सेंटर उभारण्यात आले. तसेच खाजगी डॉक्टरांनी चार ते पाच सेंटर सुरू केले आहेत. प्रथम या ठिकाणी बेड मिळणे जिकरीचे होते आता मात्र बरे होणाऱ्यांची संख्या वाढून बाधितांची संख्या कमी होत असल्याने बहुतांश सेंटरमध्ये बेड रिकामे होत आहेत.

शासनाने अनलॉक चे धोरण जाहीर करून आता सर्वच उद्योग व्यवसायांना मंजुरी दिल्याने संसर्गाची भीती विचारात घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व दुकाने व बाजारपेठ बंद करण्यासंदर्भात पालिका व पोलिसांच्या वतीने आदेशित करण्यात आले आहे. रविवार ता 4 रोजी सायंकाळपासून सातच्या आत घरात या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

त्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुकाने ,हॉटेल्स सुरू ठेवणारे व उशिरापर्यंत बाजारात भटकणाऱ्यां मधून नाराजीचा सूर व्यक्त होत असून शांतताप्रेमी नागरिक मात्र आनंदले आहेत. त्यामुळे कही खुशी कही गम असे चित्र आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com