esakal | रिक्षाचालकाचा मुलगा मेहनतीच्या जोरावर बनला इस्त्रोत संशोधक
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षाचालकाचा मुलगा मेहनतीच्या जोरावर बनला इस्त्रोत संशोधक

रिक्षाचालकाचा मुलगा मेहनतीच्या जोरावर बनला इस्त्रोत संशोधक

sakal_logo
By
चंद्रकांत चौधरी


पाचोरा : मेहनत, चिकाटी (hard work) णि इतरांपेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची जिद्द असेल तर यशाची मोठी शिखरेही पादाक्रांत करता येतात याची प्रचिती चिंचपुरे (ता. पाचोरा) येथील मूळ रहिवासी असलेल्या देवानंद पाटील या 25 वर्षीय युवकाने आणून दिली असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो) (Indian Space Research Organization) (ISRO) मध्ये जूनियर सायंटिस्ट (Junior Scientist) म्हणून स्थान मिळवले आहे.

(auto drivers son hardworking researcher isro)

पाचोरा तालुक्यातील चिंचपूर येथील सुरेश पाटील यांचा मूलगा देवानंद याने कुटुंबावर असलेले दारिद्र्याचे सावट शिक्षणाच्या माध्यमातून नष्ट करण्याचा निर्धार केला. आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने संशोधक (Researcher) होण्याचा मनस्वी निर्धार करून त्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. राजीव गांधी इन्स्टिट्यूट (Rajiv Gandhi Institute) मधून अभियंता पदवी घेतल्यानंतर त्याने बुद्धी व चातुर्याच्या जोरावर अभियांत्रिकीची पदविका (Diploma Engineering) मिळवली.

रेल्वेची नोकरी नाकारली..

गुणवत्तेच्या आधारे त्याला रेल्वेत नोकरीची संधी चालून आली परंतु ही नोकरी नाकारून त्याने अभ्यासाचे सातत्य कायम ठेवले व आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्याचे प्रयत्न गतीमान केले. जमशेदपूर येथील टाटा कंपनीत अभियंता म्हणून नोकरी स्वीकारली. आपल्या आई वडिलांनाही तो नियुक्तीच्या ठिकाणी घेऊन गेला .त्याने 2019 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवले.

जूनियर सायंटिस्ट पदावर गवसणी

केरळमधील तिरुअनंतपुरम येथे 2020 मध्ये राष्ट्रीय तांत्रिक सहाय्यक पदाची परीक्षा व जानेवारी 2019 मध्ये इस्रोच्या सलग तीन परीक्षा , प्रात्यक्षिक व मुलाखतीस सामोरे जाऊन त्यात उत्तुंग यश मिळवत जूनियर सायंटिस्ट या पदावर नियुक्ती मिळवली. देवानंदचे वडील रिक्षा चालवतात व आई गृहिणी आहे. घरात कोणताही शिक्षणाचा वारसा नसताना तसेच उच्चशिक्षण घेण्याइतपतही कुटुंबाची आर्थिक संपन्नता नसतांना केवळ मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत संशोधक म्हणून मिळवलेले स्थान प्रेरणादायी व कौतुकास्पद म्हटले पाहिजे.

(auto drivers son hardworking researcher isro)