
पाचोरापासून सुमारे ३० किलोमीटरवर असलेल्या लोहारा वनक्षेत्रात सोडण्यात आले. त्यामुळे शिवकॉलनी भागातील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पाचोरा : मानवापेक्षा पशूपक्ष्यांमध्ये मालकाविषयी निष्ठा व प्रामाणिकता प्रचंड प्रमाणात असते. त्यात श्वान म्हणजे प्रामाणिकपणाचे मूर्तिमंत उदाहरणच, असा सूर अनेकदा कानी पडतो, अथवा हा प्रकार अनेकांना अनुभवायलाही मिळतो. असाच काहीसा प्रकार येथील महाजन कुटुंबीयांच्या श्वानाने सिद्ध केला असून, या श्वानाची निष्ठा व प्रामाणिकता साऱ्यांनाच थक्क करणारी आहे.
आवश्य वाचा- गस्तीवरील पोलिसांना पाहताच संशयितांनी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला
येथील कृष्णापुरी भागातील शिवकॉलनीत वास्तव्यास असलेल्या महाजन कुटुंबीयांकडे असलेला श्वान काही दिवसांपासून परिसरातील रहिवाशांना त्रासदायक ठरला होता. त्याबाबतची तक्रार रहिवाशांतर्फे या परिसराचे नगरसेवक विकास पाटील यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी पालिकेकडे ही तक्रार मांडून या श्वानाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्याआधारे पालिकेचे कर्मचारी अनिल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाजन यांच्या या श्वानास मोठ्या शिताफीने पकडले. त्याच्या मुसक्या आवळून त्यास शुक्रवारी (ता. १५) पाचोरापासून सुमारे ३० किलोमीटरवर असलेल्या लोहारा वनक्षेत्रात सोडण्यात आले. त्यामुळे शिवकॉलनी भागातील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
आणि पोहचला कुटूंबातील सदस्याकडे
लोहारा जंगलात सोडलेले महाजन कुटुंबीयांचे श्वान परत शिवकॉलनी परिसरात मालकाकडे येईल, असे बोलले जात होते. परंतु हे श्वान पाचोरा येथे परत न येता महाजन कुटुंबातील एक सदस्य जळगाव येथील बीजे मार्केटमधील श्रद्धा ऑटो सेंटरवर कामास आहे. ते श्वान दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे जळगाव येथील श्रद्धा ऑटो सेंटरसमोर येऊन विसावले. याठिकाणी महाजन कामानिमित्त जाताच श्वान त्यांचे पाय चाटू लागले. या वेळी महाजन यांचे डोळे पाणावले.
आवर्जून वाचा- तब्बल..अडीचशे वेळा पाहिला ‘बघितला ’शुटआऊट लोखंडवाला’आणि तयार केली ‘माया गँग’
जळगावला आला कसा ?
विशेष म्हणजे, महाजन कुटुंबातील सदस्य म्हणजे आपला मालक जळगाव येथील एका दुकानावर कामास आहे, हे श्वानास कसे कळाले? या श्वानास एक दिवसही जळगाव येथे नेण्यात आलेले नसताना हा श्वान बरोबर मालक काम करीत असलेल्या व सुमारे ४० किलोमीटर दूर असलेल्या दुकानावर कसा जाऊन पोचला? याबाबतचे तर्कवितर्क केले जात असले तरी श्वानाची ही निष्ठा व प्रामाणिकपणा साऱ्यांनाच थक्क करणारा ठरला आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे