शेतकऱ्यांचे पांढरे सोने मजुर अभावी शेतातच पडून !

राजेंद्र पाटील
Monday, 19 October 2020

वादळ व पाऊस शेतकऱ्यांची झोप उडवत आहे. मजुरी मुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे. उभ्या सोयाबीन कापनी व काढणी व त्यातुन येणाऱ्या उत्पनाच्या रक्कम मेत शेतकऱ्यांना घरुण पैसा टाकावा लागत आहे.

नांद्रा (ता.पाचोरा ) ः सर्वत्र कापूस वेचणीच्या कामाला जोरदार सुरुवात झालेली असतांनाच खरीपाच्या ज्वारी ,बाजरी,मका ,सोयाबीन काढणीच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे मजुरीचे भाव वधारले आहेत. त्यात मजुरी चे भाव जरी वधारले असले तरी सर्वच शेतीकामे एकत्र आल्यामुळे मजुर देखील भाव खात आहे. त्यामुळे शेतकऱयांचे शेतमाल शेतातच पडून खराब होत आहे. 

शेतकऱयांवर आस्मानी, तसेच आर्थीक संकटासोबत आता मजुरांचे देखील संकट उभे ठाकले आहे. मधेच वादळ व पाऊस शेतकऱ्यांची झोप उडवत आहे. मजुरी मुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे. उभ्या सोयाबीन कापनी व काढणी व त्यातुन येणाऱ्या उत्पनाच्या रक्कम मेत शेतकऱ्यांना घरुण पैसा टाकावा लागत असल्यामुळे शेतकऱयांना कापुस, सोयाबीनसह अन्य उभे पिकाला सडू द्यावे लागत आहे.  

रब्बीचा हंगाम घेण्यासाठी घाई

पावसाळ्यानंतर रब्बीचे उत्पादन घेण्याची तयारी शेतकरी करीत आहे. त्यामुळे शेतातील पिक कापनी, कापुस वेचणी आदी शेतीच्या कामांना वेग आला आहे.

शेतकरी उपाशी तर मजुर तुपाशी.

मजुरी चे भाव कापूस वेचणीला 200ते250रोज तर किलोने मोजणी हि 7 ते 8 रुपये किलोने सुरू आहे.त्यातुन 500 ते 700 ,सोयाबीन कापणी 2500रुपये थैली,मका कापणी 300 रुपये रोज असल्यामुळे शेतकरी उपाशी तर मजुर तुपाशी अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora due to non-availability of labor for farm work, the farm produce of the farmers is falling on the field