
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळून आल्यास त्यावर ग्राम दक्षता समिती व ग्रामस्थ कुरंगी कारवाई करेल.
सामनेर ता.पाचोरा : कुरंगी तालुका पाचोरा येथील गट नंबर 356 लागून असलेल्या गिरणा नदीपात्रातून आज दिवसाढवळ्या विना नंबर चे दोन वाळूने भरलेला ट्रॅक्टर गावातून जात असताना गावातील ग्राम दक्षता समिती व ग्रामस्थानी मिळून ट्रॅक्टर पकडला.
ट्रॅक्टर पकडला असता ट्रॅक्टर चालकाने ट्रॉली मधील वाळू हायड्रोलिक करून रस्त्यावरच खालीकरून पळण्याच्या तयारीत असताना ग्रामस्थांनी दोघं ट्रॅक्टर अडवून पकडले. लगेच पाचोरा तहसील कार्यालयात फोन करून संबंधित ट्रॅक्टर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी एस. एल. साळुंखे शिपाई गणेश चौधरी व कोतवाल विजय कोळी यांच्या ताब्यात देऊन पंचनामा करण्यात आला व मंडळ अधिकारी साळुंखे यांना ग्रामस्थांच्या वतीने ग्राम दक्षता समिती सदस्यांनी चोरटी वाहतूक बाबत निवेदन देऊन कारवाई व्हावी अशी मागणी या वेळी केली. यावेळी ग्रामस्थ योगेश ठाकरे,सुदाम पाटिल सुनील पाटिल, सुरेश कोळी,गजानन पवार , दिपक पाटिल माजी सरपंच, गोपाल पाटिल, ज्ञानेश्वर पाटिल ,नामदेव पाटील, योगेश पाटील,कोतवाल विजय कोळी ,पोलिस पाटील गोसावी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांची झाली बैठक
"आम्ही ग्रामस्थांनी मिळून एक वर्षापासून चोरटी वाळू वाहतूक पूर्ण बंद केलेली असून यापुढे ही कुठलेही अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळून आल्यास त्यावर ग्राम दक्षता समिती व ग्रामस्थ कुरंगी कारवाई करेल व तहसील कार्यालयात ट्रॅक्टर पंचनामा करून जमा केले जाईल असे सर्व ग्रामस्थांची बैठकीत एकमताने ठरले"
नेहमी सर्व कुरंगी ग्रामस्थ व दक्षता समिती सदस्यांनी सहकार्य राहिल्यास अवैध वाळु वाहतुक कायमची बंद होण्यासाठी मदत होईल.
- कैलास चावडे तहसिलदार पाचोरा.
संपादन- भूषण श्रीखंडे