जळगावः पाचोऱ्यात मंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय खलबते

चर्चेचा तपशील बाहेर आला नसला, तरी यात विविध राजकीय विषयांवर खलबते झाल्याची माहिती समोर येत आहे.
 Minister Eknath Shinde
Minister Eknath Shinde


पाचोरा : राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांनी मंगळवारी पाचोरा येथे अचानक भेट देत आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांच्याशी बंद दरवाजाआड चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यातील काही तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित करत तेथे करावयाच्या नियोजनाची जबाबदारी मंत्री शिंदे यांच्यावर सोपवली असून, त्यासाठी त्यांनी अशा गुप्त दौऱ्यांना पाचोरा येथून सुरवात केल्याचे समजते.

 Minister Eknath Shinde
शालेय प्रलंबित मागण्यांसाठी संस्थाचालकांचे पवारांना साकडे

अत्यंत गुप्तपणे झालेल्या या दौऱ्यात मंत्री श्री. शिंदे यांनी पाचोरा व भडगाव नगरपरिषद अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतानाच आमदार पाटील यांच्याकडून पालिकेच्या आगामी राजकारणाची माहिती जाणून घेतली. जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी करावयाच्या रणनीतीबाबत त्यांनी गुप्तगू केली. शहरातील कृष्णापुरी भागातील प्रभू रामचंद्र यांच्या साक्षीने आगामी नगरपालिका निवडणुकांचे जणू त्यांनी रणशिंग फुंकले. या दौऱ्याबाबत अंत्यत गुप्तता पाळल्याने याची माहिती प्रमुख कार्यकर्त्यांसह माध्यम प्रतिनिधींना देखील नव्हती. त्यामुळे या भेटीबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


येथील हिवरा नदीकाठी असलेल्या प्रभू रामचंद्र मंदिर परिसरात झालेल्या या बैठकीस मंत्री शिंदे यांच्यासह केवळ आमदार पाटील, मुकुंद बिल्दीकर व नगराध्यक्ष संजय गोहिल हे चौघेच उपस्थित होते. या बैठकीत अनेक खलबते झाल्याची माहिती आहे. पालिकेअंतर्गत नगरविकास विभागाकडे प्रस्तावित असलेल्या कामांची त्यांनी माहिती घेत, तत्काळ सर्व विषय मार्गी लावणार असल्याचे नियोजन केले. शिवसेना पक्ष व राज्य सरकार पूर्णपणे आमदार पाटील यांच्या पाठीशी असून, त्यांना यानिमित्ताने बळ मिळाल्याची चर्चा रंगली आहे.


तिघांची बंदद्वार चर्चा
या भेटीवेळी राममंदिर परिसरात मंत्री एकनाथ शिंदे, आमदार किशोर पाटील व मुकुंद बिल्दीकर या तिघांमध्ये बंदद्वार चर्चा झाली. या चर्चेचा तपशील बाहेर आला नसला, तरी यात विविध राजकीय विषयांवर खलबते झाल्याची माहिती असून, पालिका निवडणुकांची रणनीती आखली गेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

 Minister Eknath Shinde
अमळनेर : डॉ. कलाम सेंटरसाठी चार शाळांची निवड

ज्योतिषी भेटीची चर्चा
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. त्यामुळे त्यांची ही खासगी भेट नेमकी कशासाठी, याचे तर्कवितर्क लढविले जात आहे. दरम्यान, मंत्री शिंदे हे पाचोरा शहरातील गजानन नामक तरुण ज्योतिषाकडे आल्याची चर्चा रंगली आहे. शिंदे यांनी दुपारी बाराच्या सुमारास भेट देत सुमारे तासभर चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील हेविवेटचे मंत्री असून, त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यततीत असल्याचे बोलले जाते. दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना मुख्यमंत्री करून दाखवतो, असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यामुळे शिंदे नशीब आजमावण्यासाठी भविष्यकाराकडे गेले नसावेत, ना अशी चर्चा रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com