मामाच्या घरी भाऊबीजला भाचा आला आणि शेततळ्यात जीव गमावून बसला

भगवान पाटील
Tuesday, 17 November 2020

भाचा पाण्यात बुडत असल्याने जीवाची परवान न करता भाच्याला वाचविण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारली. परंतू मामाचे प्रयत्न अपुरे पडले.

निंभोरी (ता पाचोरा ) : भाऊबीजला आई सोबत मामाच्या घरी आलेला भाच्याचा शेततळ्यात पोहतांना पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी घडली. भाऊबीजलाच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कुऱ्हे ( पाणाचे)(ता भुसावळ)येथील सैन्य दलात वैद्यकीय विभागात नोकरीला असलेले दिपक लहानू पाटील हे पत्नी सोनाली सोबत मुलगा कूष्णदिप दिपक पाटील (वय १३) हे सोमवारी भाऊबीज असल्याने माहेरी वाणेगांव (ता पाचोरा) येथे माहेरी दुपारी तीन वाजता मोटारसायकल वर सोडून घरी परत गेले. त्याचा मुलगा कूष्णदिप काही वेळात मामा संदीप सोबत लगेच लोहारी शिवारातील शेतात गेले तेथे मोठे एक ऐकरचे शेततळे होते तेथे कूष्णदिप पोहण्यासाठी गेला त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला.

पोहता येत नाही तरी मामाने मारली उडी

शेततळ्यात चाळीस फुट पाणी त्यात भाचा कृष्णदीप बुडत असल्याचे मामा संदीपने बघितले. संदीपला ही पोहता येत नाही तरी भाचा आपला भाचा पाण्यात बुडत असल्याने जीवाची परवान न करता भाच्याला वाचविण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारली. परंतू मामाचे प्रयत्न अपुरे पडले आणि कृष्णदिपचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

 

वडील सुट्टीवर आलेले

कृष्णदिप हा  भुसावळ येथील इग्लिश मेडियम स्कूलमध्ये सातवी च्या वर्गात शिकत होता. तर वडील सैनिक दलाल नोकरीला असून दिवाळी साठी सुटीवर आले असतांना अशी दुर्घटना घडली. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora thirteen year old boy drowns in farm