आई-वडील मुलाला होकार कळविण्यासाठी गेले आणि घरी डाॅक्टर मुलीने असे भयंकर केले

शंकर भामेरे
Tuesday, 15 December 2020

उपवर मुलाला होकार कळविण्यासाठी पत्नी, मुलगा शुभम व मुलगी स्नेहल यांच्यासह पालघर जिल्ह्यातील जवाहर येथे गेलेले होते.

पहूर ः घरी कोणीही नसल्याचे पाहून डॉक्टर तरुणीने ओढणीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवण्याची  हृदयद्रावक घटना आज मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. 

आवश्य वाचा- राज्यपाल म्हणतात शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील संतोषीमातानगर मधील रहिवासी शामराव नामदेव सावळे हे  त्यांची मुलगी डॉ. प्रतिभा श्यामराव सावळे ( २३ वर्षे ) हिच्या विवाहा संबंधी. उपवर मुलाला होकार कळविण्यासाठी   पत्नी, मुलगा शुभम व मुलगी स्नेहल यांच्यासह पालघर जिल्ह्यातील जवाहर येथे गेलेले होते दरम्यान डॉ. प्रतिभा घरी एकटीच होती. शेजारीच राहणाऱ्या काकांकडे तिने दुपारी १ वाजेच्या सुमारास जेवण करून आपल्या घरी आली होती. तीचे काका रामराव सावळे हे शेतातून घरी आल्यावर डॉ. प्रतिभाचा फोटो आणण्यासाठी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांनी मुख्य दरवाजा ठोठावला. मात्र घरातून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे  काका रामराव सावळे यांनी त्यांच्या मुलीला घरात जाण्यासाठी लहान जागा आहे, तिथून पाठवले असता डॉ .प्रतिभाने गळफास घेतला असल्याचे तिने सांगितले. त्यांनंतर दरवाजा उघडून त्यांनी आत मध्ये प्रवेश केला असता डॉ . प्रतिभा हिने भिंती जवळील छतास असलेल्या कडीला ओढणी बांधून जीवनयात्रा संपवल्याचे आढळून आले. 

यानंतर आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने पोलिसांच्या समक्ष ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ . जितेंद्र वानखेडे यांनी   तपासणी केल्यावर तिला मृत घोषित केले .रात्री  शवविच्छेदन करण्यात येणार आहे. याप्रकरणी रामराव नामदेव सावळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाचा- बदनामीला घाबरली; याचा फायदा घेत दोन वर्ष अत्याचार

सर्वत्र हळहळ..
डॉ .प्रतिभा लहानपणापासूनच हुशार मुलगी होती .डॉक्टर होवून गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे तिचे स्वप्न होते .आई-वडिलांनी मोठ्या प्रयत्नांनी तिच्या स्वप्नांना जपत तिचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते .नगर जिल्ह्यातील शेवगांव येथे पद्मश्री विखे पाटील मेडिकल कॉलेजमधून तिने बी . ए . एम एस .ची पदवी संपादन केली होती .तिच्या अकस्मात जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . तीच्या पश्चात आई -वडील , भाऊ डॉ . शुभम आणि बहीण स्नेहल असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pahur doctor girl committed suicide by hanging herself at home