
यंदा मात्र लग्नसराईत तुना प्यारमा पागल व्हयना ये या गीताने अहिराणी गितात यशाचा टप्पा गाठीत व-हाडी मंडळींचे मन जिंकले आहे.
पारोळा ः लग्न समारंभ म्हटला कि,बँन्ड व डि जे अनन्य साधारण महत्व असते.धामधुम शिवाय व-हाडी मंडळी बैचेन राहते. यासाठी आयोजक या मंगल कार्यात बँन्ड किंवा डिजे आवर्जुन लावत आनंद व्यक्त करतात. यात अहिराणी गितांची क्रेझ वाढली असुन नाचणार्यांना 'कडुन तुना प्यार मा पागल व्हयना ये' या अहीराणी गिताने धमाल केली आहे.
आवश्य वाचा- शोधून शोधून थकली..व्याकूळ होवून बसली; अचानक ‘आऽऽई’ हा शब्द कानावर आला आणि सारेच निशब्द!
आजकाल बँन्ड व डिजे यांच्यात स्पर्धा निर्माण झाली.यामुळे प्रत्येक जण आपल्या कौशल्यातुन वेगळे काही देण्याचा प्रयत्न करित घेतलेल्या मोबादल्याचे देणार्यास समाधान मिळावे व त्याच्या माध्यमातुन इतर दुसरे काम मिळावे या भावनेतुन बँन्ड व डि.जे. चालक आपल्या या माध्यमातुन नवा लुक देण्याचा प्रयत्न करित आहे. कोरोनाच्या सावटात आधीच गेली तीन चार महिने बँन्ड व डिजे बंदी होती. त्यात लग्नसराईत गर्दी न करण्याचे प्रशासनाने मिळालेले संकेत पाहता हळुहळु बँन्ड व डिजेला परवानगी मिळाली आहे. यात व-हाडी मंडळीचा नवा लुक पाहता बँन्ड चालक व डिजे यांच्यात स्पर्धा निर्माण झाली आहे.
केसावर फुगे, आता तुना प्यार मा..या गाण्यांची धुम
दरवर्षी एखादे गीत मनाला भुरळ घालीत आपलेसे करण्याचा प्रयत्न करते.मागील वर्षी केसावर फुगे या गीताने भुरळ घालीत मन जिंकले होते. यंदा मात्र लग्नसराईत तुना प्यारमा पागल व्हयना ये या गीताने अहिराणी गितात यशाचा टप्पा गाठीत व-हाडी मंडळींचे मन जिंकले आहे.या गीताने चांगला लुक देत आनंद द्विगुणीत केल्याचे दिसुन येत आहे.
आवर्जून वाचा- कस होणार जळगावच! आधीच खड्यांनी नागरीक त्रस्त, त्यात रस्त्याच्या कामास ठेकेदाराची ना
खानदेशात अहिराणी गितांचे महत्व
खानदेशातील लग्न समारंभात अहिराणी गाण्यांचे वेगळे महत्व आहे. यात हळद लावणे ते तेलन पाडतांना अहिराणी गाणी म्हतले जाते. तसेच तर वेगवेगळ्या अहिराणी गीतावर वारंवार व-हाडी मंडळी आपला आनंद द्विगुणीत करित असुन मंगल पर्वात का असेना मात्र खानदेशासह इतर राज्यात अहिराणी गितांचे आज देखील महत्व वाढतांना दिसत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे