esakal | शंखनादाने श्री बालाजी मंदीर, पाडवा पहाटने झपाटभवानी मंदीर भक्तांसाठी खुले
sakal

बोलून बातमी शोधा

शंखनादाने श्री बालाजी मंदीर, पाडवा पहाटने झपाटभवानी मंदीर भक्तांसाठी खुले

भावीकांसह प्रवेश पुजन व महाआरती करुन तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी अर्चक संजय पाठक यांनी राज्य शासनाचे आभार मानीत.शासनाचे नियमांचे पालन करित सामाजिक अंतर ठेवुन दर्शनाची सोय करण्यात येईल असे सांगितले.

शंखनादाने श्री बालाजी मंदीर, पाडवा पहाटने झपाटभवानी मंदीर भक्तांसाठी खुले

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा : कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढु नये यासाठी गेल्या मार्च महीन्यापासुन राज्यातील सर्वच मंदीरांना ताळेबंदी करण्यात आली होती. दरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे दिसुन येत असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंदीर उघडले जाणार असल्याचे घोषित केल्याने त्या पाश्वभुमीवर आज शहरातील आराध्य दैवत श्री. बालाजी मंदीर येथे सकाळी 5 .27 वाजता शंखनाद तर पुरातन झपाटभवानी मंदीरात पाडवा पहाट साजरी करुन भक्तांसाठी मंदीरे खुली करण्यात आली. यामुळे शहरातील भक्तांना ऐन दिवाळी मंदीरात प्रवेश करता येणार असल्याने दिवसभर भक्तांची दर्शनासाठी मांदीयाळी दिसुन आली.

वाचा- प्रसिध्द सराफ व्यवसायीक रतनलालजी बाफना यांचे निधन -

श्री बालाजी मंदीरात शंखनाद व अभिषेक पुजन
राज्य सरकारकडुन आदेश मिळाल्याने  ता,16 रोजी ब्रह्ममुहर्तावर सकाळी 5.27
अर्चक, विश्वस्त यांचेसह शंखनाद करुन मुख्खद्वार उघडण्यात आले.त्या नंतर सभामंडप,द्वारपुजन,तोरण गणपती पुजन करुन उंबरठा पुजन करण्यात आले.यावेळी पुन्हा शंखनाद करुन आतप्रवेश करण्यात आला.यावेळी राकेश शिंपी प्रथमदर्शनी भावीकाने श्री बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले.सकाळी 10.30 ते 11 वाजता भावीकांसह प्रवेश पुजन व महाआरती करुन तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी अर्चक संजय पाठक यांनी राज्य शासनाचे आभार मानीत.शासनाचे नियमांचे पालन करित सामाजिक अंतर ठेवुन दर्शनाची सोय करण्यात येईल असे सांगितले.

पाडवा पहाट ने झपाटभवानी  मंदीर खुले 
 येथील पुरातन झपाटभवानी व गजानन महाराज संस्थान येथे दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम करून  मंदिरे उघडल्याचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी संस्थानचे माऊली भजनी मंडळातर्फे भक्ती संगीत व भावगीते सादर करण्यात आली .अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष मंगेश तांबे,गिरीश टोळकर, जयेश सोनार यांनी विविध गीते व भक्तिगीते सादर केली.मोहित तांबे व जयेश सोनार यांनी तबला व मृदुग तर गिरीश टोळकर यांनी हार्मोनियम वर आणि कार्यक्रमात सतीश वाघ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग व मास्क तसेच सॅनिटायझर ची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमासाठी कार्याध्यक्ष संजय सोनार ,जावेद मिस्त्री,दिपक पिले,रवी चौधरी,पुष्कराज संत,कुणाल मोरे,संदीप वानखेडे, यांनी परिश्रम घेतले तसेच संगीत शिक्षक संजय रमेश पिले यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी महाआरती होवुन भावीकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी नगरसेवक मंगेश तांबे यांनी राज्य सरकारचे आभार मानीत  कोरोना काळात भावीकांची काळजी घेतली जाईल असे सांगितले.

संपादन- भूषण श्रीखंडे