esakal | दिवाळीची पणती लावण्यापुर्वीच संसार उध्वस्‍त; पण गोड करण्याचा प्रयत्‍न
sakal

बोलून बातमी शोधा

fire in house

अवघ्‍या एका दिवसावर दिपोत्‍सव येवून ठेपला होता. घरात त्‍याची तयारी देखील झाली होती. अशात 11 नोव्हेंबरला पहाटे तीनच्या सुमारास चिमणीच्या भडक्याने लागलेल्या आगीत सकट कुटुंबीयांचे झोपडीसह सारा संसार जळून खाक झाल्याची घटना घडली.

दिवाळीची पणती लावण्यापुर्वीच संसार उध्वस्‍त; पण गोड करण्याचा प्रयत्‍न

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा (जळगाव) : दबापिंप्री (ता.पारोळा) येथील सकट कुटुंबीयांचा संसार आगीत उध्वस्त झाला होता. एक दिवसावर दिवाळी आली असताना दारासमोर पणती लावायची वेळ झाली होती. अशात संपुर्ण घर आगीत भस्‍म झाल्‍याने प्रकाशमान करणाऱ्या दिवाळीत कुटूंबासमोर अंधार होता. पण या कुटुंबीयांना मदत मिळवून देत त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्‍न करण्यात आला.
अवघ्‍या एका दिवसावर दिपोत्‍सव येवून ठेपला होता. घरात त्‍याची तयारी देखील झाली होती. अशात 11 नोव्हेंबरला पहाटे तीनच्या सुमारास चिमणीच्या भडक्याने लागलेल्या आगीत सकट कुटुंबीयांचे झोपडीसह सारा संसार जळून खाक झाल्याची घटना घडली. उघड्यावर आलेल्या या कुटुंबियांना ऐन दिवाळीत कुटुंबीय उघड्यावर आले होते.

तरूण आले धावून
सदरच्या घटनेची माहिती जळगाव येथील विराज कावडिया, अमित जगताप, हितेश पाटील यांनी मिळाली. कुटुंबाच्या घटनेविषयी माहिती जाणून घेतली आणि तात्काळ रत्नापिंप्री येथील रामचंद्र पाटील यांचेशी मोबाईलवर संपर्क साधून कुटुंबाला काय मदत करता येईल. तसेच झालेल्या घटनेविषयी अधिकृत माहिती जाणून घेत कुटुंबाला मदतीसाठी धावून आले. 

संपुर्ण किराणा घरात
जळगावच्या युवाशक्ती फाऊंडेशन व शिवसेना यांच्यावतीने महिन्याभराचा किराणा बाजार, तेल, दाळी, शेंगदाणा, मग, चवळी, तांदूळ, हळद, मसाला, चहा, साखर तसेच दिवाळीचा फराळ आणि मिठाई, थंडीचे दिवस असल्याने कंबल,चादर आज प्रत्यक्षात येवून कुटूंबाला देण्यात आली. तसेच येत्या दोन दिवसात गॅसची व्यवस्था करण्यात आली. दिवाळीत उघड्यावर पडलेल्या कुटुंबातला आर्थिक मदत व किराणा इतर साहित्य देऊन दात्यांनी सकट कुटुंबियांची दिवाळी गोड केले. कुटुंबीयांना मदत देऊन उघड्यावर पडलेल्या गरीब कुटुंबाची मदत करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. तसेच जिल्हा परिषद सदस्य हिम्मत पाटील यांनी देखील कुटुंबासाठी आर्थिक मदत दिली. त्यांना ही मदत मिळाल्याने त्यांनी युवाशक्ती फाऊंडेशन व शिवसेना जळगाव यांचे आभार व्यक्त केले.

संपादन ः राजेश सोनवणे