
कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल तीन महिने लाँकडाऊन राहिला. यामुळे सर्वसामान्य जनतेसह व्यापारी व नागरिक यांच्यावर मोठ्या प्रमाणात संकट कोसळले होते.
पारोळा (जळगाव) : दिवाळी व भाऊबीज या सणात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे फिरणे झाल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेवून कोरोना आढावा बैठकीच्या पाश्वभुमीवर महामार्गासह शहरातील मुख्ख बाजारपेठ, भाजीपाला विक्रेतासह सर्वच व्यापारी यांनी जनता कर्फ्यु पुकारला होता. त्यास प्रतिसाद लाभला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल तीन महिने लाँकडाऊन राहिला. यामुळे सर्वसामान्य जनतेसह व्यापारी व नागरिक यांच्यावर मोठ्या प्रमाणात संकट कोसळले होते. हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना शहरातील अनेक दात्यांनी सामाजिक बांधिलकीतून योगदान देत त्यांची गरज भागविली होती. आता सर्वत्र अनलाँक झाल्यानंतर टप्याटप्याने सर्वच सुरु होत असल्याचे पाहुन समाधान व्यक्त होत होते. मात्र ऐन दिवाळी व भाऊबीज सणांमुळे नागरिकात मोठ्या प्रमाणात संक्रमण झाल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सारे काही बंद
जिल्हयात देखील रुग्ण संख्येत वाढ झाल्याने खबरदारी हा उपाय पाहता प्रशासनाने आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली होती. यात एकमुखी निर्णयातून जनता कर्फ्यु पाळण्याचे जाहिर झाल्याने सोमवार (ता. 23) जनता कर्फ्यु पाळण्यात आला. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच महामार्गासह बाजारपेठेतील दुकाने बंद होती. यावेळी व्यापारी महासंघाने प्रशासनाच्या सुचनेस पाठिंबा दिल्याने त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात आले.
मंगळवारी नियमित बाजारपेठ
कोरोनाची दुसरी लाट अतीशय भयंकर व सुनामी प्रकारची असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले असुन यासाठी नागरिकांनी बाजारपेठ व शहर परिसरात सामाजिक अंतर व तोंडाला मास बांधुन वस्तु खरेदीसाठी यावे असे आवाहन करण्यात आले असुन मंगळवार पासुन बाजारपेठ पुर्ववत सुरु राहतील असे सांगण्यात आले.
संपादन ः राजेश सोनवणे