esakal | शिक्षकाने दाखवली भुतदया...आणि दोन दिवसापासून विहरीत पडलेल्या घुबडला मिळाले जीवनदान ! 
sakal

बोलून बातमी शोधा

 शिक्षकाने दाखवली भुतदया...आणि दोन दिवसापासून विहरीत पडलेल्या घुबडला मिळाले जीवनदान ! 

गेल्या दोन दिवसापासुन विहीरीच्या पाण्यात पडलेली जंगली दुर्मिळ घुबड ही थंडीने हुळहुळ करित होती.श्री साळुंखे यांनी केलेले शर्थीचे प्रयत्न व पक्षी मित्र यांचे धाडस मुळे घुबडला जीवनदान मिळाले.

शिक्षकाने दाखवली भुतदया...आणि दोन दिवसापासून विहरीत पडलेल्या घुबडला मिळाले जीवनदान ! 

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा ः दुर्मिळ जंगली घुबड फुंकुन डोळे फोडतो या अफवेमुळे या पक्ष्याला विहीरीतुन काढण्याची हिम्मत कुणीही केली नाही.मात्र भिलाली येथील मुळचे रहीवाशी व किसान माध्यमिक विद्यालय लोणी ता,पारोळा, जि. जळगाव येथील माध्यमिक शिक्षक श्‍यामकांत साळुंखे यांना सदरच्या घटनेची माहीती कळताच प्राणीमात्रा विषयी भुतदया दाखवित पक्षीमित्रांच्या मदतीने घुबडास जीवनदान दिल्याने ग्रामस्थांनी त्यांच्या माणुसकी पणाचे कौतुक केले. 

भिलाली शिवारातील श्‍यामकांत साळुंखे यांच्या शेतातील विहीरीत गेल्या दोन दिवसापासुन हे जंगली दुर्मिळ घुबड पडले होते. मात्र गावात भितीने ग्रामस्थ या परिसरात कामास ही फिरकत नव्हते. सदरची घटना श्री साळुंखे यांना समजली असता त्यांनी सोशल मिडीयावर आवाहन केले होते.परंतु मदतीस कुणीही भितीने जवळ येत नव्हते.शेवटी श्री साळुंखे सर यांनी शहरातील पक्षीमित्र भावडु जगताप,जितेंद्र वानखेडे, नितीन वानखेडे व मयुर पाठक यांना हकीकत कथन केली. पक्षी मित्र यांना सोबतीस घेवुन घुबडला जीवनदान देण्याची विनंती केली.यावेळी पक्षमित्रांनी क्षणाचाही विलंब न करता भिलाली शिवारातील विहीरीत उतरुन घुबडला वाचविणेसाठी शर्थीचे प्रयत्न करुन जीवनदान दिले. 

अखेर घुबडला मिळाले जीवनदान,वनविभागकडे सुपुर्द 
गेल्या दोन दिवसापासुन विहीरीच्या पाण्यात पडलेली जंगली दुर्मिळ घुबड ही थंडीने हुळहुळ करित होती.श्री साळुंखे यांनी केलेले शर्थीचे प्रयत्न व पक्षी मित्र यांचे धाडस मुळे घुबडला जीवनदान मिळाले.ग्रामस्थ भितीने पुन्हा घाबरतील याचा विचार करित शेवटी वनविभागाकडे घुबला सुपुर्द करण्यात आले.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेसह,वनपाल व वनरक्षक उपस्थित होते. 

वनविभागाने केले शिक्षकांच्या माणुसकीचे कौतुक व पक्षीमित्राचे अभिनंदन 
आज काल जो तो स्वहीत पाहुन खडतर किंवा अंगावर येणारे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करतो.परंतु आजही समाजात माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय माध्यमिक शिक्षक श्‍यामकांत साळुंखे यांच्या प्राणीमात्रावरिल भुतदयेतुन आला. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर एस दसरे यांनी शिक्षकांचे कौतुक करित पक्षीमित्रांच्या या धाडसी कर्तृत्वाचे अभिनंदन केले. यावेळी दरम्यान जंगली दुर्मिळ घुबड पाहण्यास शहरातील नागरिकांना मोह आवरता आला नाही. 
 

loading image