शिरसमणीजवळ अपघात; 52 वर्षीय इसमाचा मृत्यू, पत्नी जखमी 

संजय पाटील
Monday, 30 November 2020

हनुमंतखेडे व शिरसमणी दरम्यान आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अपघात घडला. सुरेश विक्रम पाटील (वय 52) व त्यांच्या पत्नी कल्पना सुरेश पाटील (वय 45, रा.देवगांव ता. पारोळा) हे मोटरसायकल (क्र. एमएच 19 बीसी 2654) काम आटोपून घरी परत येत होते.

पारोळा (जळगाव) : शिरसमणीजवळ ट्रक व मोटरसायकल अपघातात 52 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला व त्यांच्या पत्नी जखमी झाल्या असल्याची घटना घडली आहे.
हनुमंतखेडे व शिरसमणी दरम्यान आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अपघात घडला. सुरेश विक्रम पाटील (वय 52) व त्यांच्या पत्नी कल्पना सुरेश पाटील (वय 45, रा.देवगांव ता. पारोळा) हे मोटरसायकल (क्र. एमएच 19 बीसी 2654) काम आटोपून घरी परत येत होते. दरम्‍यान समोरून येणाऱ्या ट्रक (एमएच 18 बीए 0954) जोरदार धडक दिली. त्यात मोटरसायकल चालक सुरेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी कल्पना पाटील या गंभीर जखमी झाल्‍या आहेत. यावेळी परिसरातील नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मयत व जखमीस रुग्णवाहीका चालक ईश्वर ठाकुर यांनी रुग्णवाहिकेत पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. याबाबत पारोळा पोलिसात ट्रक चालक प्रवीण बाबूलाल पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

रस्त्याची दयनीय अवस्था
हनुमंतखेडे शिरसमणी या पाच किलोमीटर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून यामुळे अनेक लहानमोठे अपघातांचे सत्र सुरू आहे. याला सार्वजनिक बांधकाम जबाबदार असल्याचा आरोप समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन यांनी केला आहे. खराब रस्‍त्‍यांची दुरूस्‍ती करण्याबाबत वेळोवेळी विचारणा केली आहे. पण संबंधित विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola road accident one death and wife injured