शहरातील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागाकडे धाव

शहरातील अनेकांनी लसीकरणासाठी पहाटपासून रांगा लावल्या होत्या.
शहरातील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागाकडे धाव


पारोळा : शासनाने लसीकरणाच्या (vaccination) दुसऱ्या टप्यात १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी (online Registration) करण्याचे घोषित केले. या पार्श्वभूमीवर तालुक्यात शिरसोदे व पारोळा (parola) केंद्रात (center) लसीकरणाला सुरवात देखील करण्यात आली. मात्र, लसीकरणात सर्वांत जास्त लसीचा डोस जळगाव (jalgaon) येथील रहिवाशांनी पारोळा येथील लसीकरण केंद्रावर घेतल्याने तालुक्यातील लाभार्थी ऑनलाइन रजिस्ट्रेशनबाबत नाखूश दिसून आले.


(run rural areas vaccination urban citizens)

शहरातील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागाकडे धाव
शेतकऱ्यांना कर्जासह खते, बियाणे वेळेवर द्या !

या वेळी पारोळा येथील केंद्रावर शुक्रवारी (ता. ७) दुपारी तीनदरम्यान १११ जणांना लसीकरणाचे डोस देण्यात आले. यात तब्बल ४९ जण हे जळगाव येथील आहेत. कोवॅक्सिनचा पहिला डोससाठी १८ ते ४४ ऑनलाइन नोंदणी पूर्ण करण्यात आली होती. पारोळा येथे शुक्रवारी (ता. ७) या साठी एनईएस गर्ल्स शाळा तर शिरसोदे (ता. पारोळा) येथे करण्यात आले. मात्र, ही नोंदणी ऑनलाइन पद्धतीने असल्याने तालुक्यातील १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण नोंदणीचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, जळगाव, अमळनेर व परिसरातील तालुक्यातील वरील वयोगटातील नागरिक हे केंद्रात लसीकरणासाठी येत होते. परिणामी, शहरातील अनेकांनी लसीकरणासाठी पहाटपासून रांगा लावल्या होत्या. त्यांना उशिरा कळाल्याने त्यांना माघारी परतावे लागले.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत १५४ जणांना कोवॅक्सिन लसीचा डोस देण्यात आला. उर्वरित ४६ जण हे पाचपर्यंत पारोळा लसीकरण केंद्रावर न आल्याने ते डोसेस शिल्लक आहेत. दरम्यान, वरिष्ठ पातळीवरून पुढच्या मार्गदर्शक सूचना येईपर्यंत हे डोसेस वापरले जाणार नाही, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे यांनी सांगितले.

शहरातील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागाकडे धाव
जळगाव जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवे रुग्ण वाढले


सूचना फलक लावावे
सध्या लसीकरण घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. परिणामी, सामाजिक अंतराचा फज्जा उडत आहे. किंबहुना पहिला किंवा दुसरा डोस याबाबत नागरिकात संभ्रमता निर्माण होते. यासाठी प्रशासनाने डोस ज्या दिवशी उपलब्ध होतात, त्या दिवसाच्या सायंकाळी कोणती लस केंद्रावर मिळणार व कोणत्या वयोगटाने घ्यावी. डोस संख्या किती? असा स्पष्ट उल्लेख केला तर नागरिकांचा गोंधळ उडणार नाही. यासाठी सूचना फलक आदल्या दिवशी लावण्याची मागणी लसीकरण धारकांनी केली आहे.

शहरातील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागाकडे धाव
धुळ्यात टॉसीलीझुमॅबचा काळाबाजार; इंजेक्शन विकणारे अटकेत

शिरसोदे येथे प्रतिसाद
तालुक्यात पारोळा व शिरसोदे अशी दोन लसीकरण केंद्रे १८ ते ४४ वयोगटासाठी होती. या वेळी या केंद्रावर १०० डोस पाठविण्यात आले. या पैकी ऑनलाइन रजिस्टेशन केलेल्या १०० पैकी ५४ जणांना लस देण्यात आली. उर्वरित ४६ व पुन्हा अजून काही डोस उपलब्ध करुन या केंद्रावर १८ ते ४४ वयोगटांना लसीकरण केले जाणार असल्याचे डॉ. सुनील पारोचे यांनी सांगितले.

(run rural areas vaccination urban citizens)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com