esakal | पांढऱ्या सोन्याला भाद्रपदेची ऊब..!
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton Crop Damage

पांढऱ्या सोन्याला भाद्रपदेची ऊब..!

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळाः गेल्या दोन वर्षापासुन महामारीचा भयावह परिस्थितिचा सामना करुन कसेबसे खरीप हंगाम चांगले येईल या आशेने शेतकऱ्यांनी पुन्हा लढ म्हणत काळ्या आईच्या पदरी पिकांची लागवड केली. मात्र पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने उन्हात पिके (Cotton Crop Damage) माना टाकु लागली. तालुक्यात तीनदा मरझळ करुन पिकांना जीवदान देण्याचे काम शेतकऱ्यांने (Farmers) केले. मात्र अतिवृष्टिने (Heavy Rain) सार्या स्वप्नावर पाणी फिरविले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व परिसरात बोरी धरण तुडुंब भरले. काही पाणी नदीतुन विसर्जित तर डाव्या व उजव्या कालव्यातुन कालव्यांचे पुर्नभरण करण्यात आले.

तालुक्यातील प्रकल्पात पाणी आले. मात्र अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पसरली. पांढरे सोने काळे पडले तर काहींनी कापसाला रस्त्यावर पेरत भाद्रपदेची ऊब दिली. शेतकऱ्यांना अतिवृष्टिच्या संकटातुन बाहेर काढणे आवश्यक असुन शासनाने सरसकट मदत जाहीर करावी.अशी मागणी शेतकरीवर्गाकडुन व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील पाचही मंडळात अतिवृष्टि

तालुक्यातील पारोळा,बहादरपुर,चोरवड,शेळावे, तामसवाडी अशी पाच मंडळे आहेत.या पाचही मंडळात अतिवृष्टि झाल्याने पिके पाण्याखाली आली आहेत.यासाठी महसुल व कृषी विभागाने शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

पारोळातील 44726 हेक्टर क्षेत्र बाधीत

तालुक्यातील खरीप हंगामात पाच मंडळात सततचा पाऊस,ता,27 ,28 व 29 सप्टेंबर रोजी तीन दिवसाची गुलाबी वादळासह पाऊस तसेच 2 आॅक्टोबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली.यात नगदी पिक कापुस 43166 हेक्टर,ज्वारी 800 हेक्टर, हेक्टर,बाजरी 580 हेक्टर तर मका 180 हेक्टर बाधीत झाले आहे. अश्या संपूर्ण हेक्टरचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आला असुन तलाठी,ग्रामसेवक व सहाय्यक कृषी अधिकारी हे संयुक्तपणे तालुक्यात पंचनामे करित असुन पंचनामान्यात बाधीत क्षेत्राची आकडेवारी कमी अधिक होण्याची शक्यता तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी सकाळशी बोलतांना सांगितली.

धरणे तुपाशी मात्र शेतकरी उपाशी

सतधरणे तुपाशी मात्र शेतकरी उपाशीतचा पावसामुळे तसेच पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे बोरी धरण ओव्हर प्लो होवुन त्याने शंभरी पार केली आहे. तर म्हसवे धरणातुन सीडीलिंकट द्वारे भोकरबारी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्यात आले.त्यामुळे भोकरबारी ने चाळीशी पार केली आहे.तर बोरी धरणातुन डाव्या कालव्याद्वारे तब्बल 35 दिवसानंतर कंकराज धरणाचे पुर्भभरण होवुन त्याने शंभरी पार केली आहे.तर लघुप्रकल्प शिरसमणी 90टक्के व पिंपळकोठा 100 टक्के भरले असुन खरीप हंगामात पाण्यात गेला असुन रब्बी हंगामा चांगला यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

loading image
go to top