वडील शेतात, आई दवाखान्यात...अन्‌ नारधामाने साधली हीच संधी ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

माझ्यासोबत चल असे म्हणून तिचा हात पकडून गावाबाहेरील भवानी मंदिराजवळ घेऊन गेला व तिच्याशी अश्‍लील काम केले तिने आरडाओरड केली.

पारोळा  : महाळपूर (ता. पारोळा) येथे एका दहा वर्षीय बालिकेवर 50 वर्षीय वृद्धाने अत्याचार केला. समाजमन सुन्न करणारी घटना शुक्रवारी (ता. 3) घडली. 

महाळपूर येथील वडील शेतात तर आई अमळनेर येथे दवाखान्यात गेली असताना त्यांची एक 14 वर्षीय मुलगी , एक दहा वर्षीय मुलगी व मुलगा सात वर्ष असे घरी असताना गावातील महादू भिला थोरात याने दहा वर्षीय मुलीला माझ्यासोबत चल असे म्हणून तिचा हात पकडून गावाबाहेरील भवानी मंदिराजवळ घेऊन गेला व तिच्याशी अश्‍लील काम केले तिने आरडाओरड केल्याने त्यावेळेस तिची आत्या शेतात जात असताना तिला मुलीचा आवाज ऐकू आल्याने ती तेथे आली तेव्हा महादू पळून गेला,आत्याने मुलीला घरी सोडले व शेतात चालली गेली.

दुपारी 4:30 वा मुलगी घरी रडत असताना तिच्या आईने तीस विचारले त्यावेळी तिने घडलेली हकीकत सांगितली त्यानंतर रात्री मुलीला घेऊन आई-वडील पोलीस ठाण्यात आले. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात महादू भिला थोरात रा. महाळपूर ता, पारोळा याविरुद्ध फिर्याद देऊन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाचोरा पोलीस स्टेशन विजया वसावे हे करीत आहेत.तर रात्री उशिरा मुलीची वैद्यकीय तपासणी साठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान आरोपी महादू थोरात फरारी झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola Ten year old girl Tyranny by 50 year old man