बोरी धरणातुन डाव्या कालव्यात पाणी,विहीर पुनर्भरण व पाणीपातळी वाढण्यास होणार लाभ 

संजय पाटील 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

धरणाची पाणीपातळी व सुरक्षितेच्या दृष्टीने दरवाज्यातुन पाण्याचा नदीप्रवाहातुन विसर्ग केला जात आहे.काही दिवसापुर्वी उजव्या कालव्यातुन कंकराज  लघु पाटबंधारे पुनर्भरण सुरु आहे.

पारोळा : बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढली.यामुळे  गेल्या आठवड्या भरापासुन नदीतुन पाण्याचा विसर्ग होत आहे.बोळेसह करंजी परिसरातील नागरिकांना डाव्या कालव्याच्या माध्यमातुन विहीर पुनर्भरण व जमिनीत पाण्याची पातळीत वाढ व्हावी यासाठी करंजी ग्रामपंचायतसह इतर गावांनी मागणी केल्याने अखेर ता,1 रोजी बोरी डाव्या कालव्यातुन 20 क्युसेस पाणी सोडण्यात आले.असल्याची माहीती शाखा अधिकारी पी जे काकडे,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व्ही एम पाटील यांनी दिली.

तालुक्यासह शहरात मोठ्या पावसाची प्रतिक्षा केली जात आहे.मात्र पाहीजे त्या प्रमाणात वरुण राजा बरसत नसल्याने शेतकरी चिंतातुर आहे.दरम्यान बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला.यामुळे यंदा जुलै महीन्यातच धरण पुर्णत भरले.धरणाची पाणीपातळी व सुरक्षितेच्या दृष्टीने दरवाज्यातुन पाण्याचा नदीप्रवाहातुन विसर्ग केला जात आहे.काही दिवसापुर्वी उजव्या कालव्यातुन कंकराज  लघु पाटबंधारे पुनर्भरण सुरु आहे.आता डाव्या कालव्यातील गावांच्या पाणी पातळीत वाढ व विहीरींची पाणी पातळीत वाढ व्हावी.यासाठी बोरी धरणातुन 20 क्युसेस ने पाणी सोडण्यात आले.

डाव्या कालव्यातुन पाण्याच्या प्रवाहाने या गावांना होणार लाभ
बोरी धरणातुन तामसवाडी - बोळे तांडा,शेवगे प्र ब,मुंदाणे प्र अ व करंजी बु या परिसरातील गावांना डाव्या कालव्या पाण्याचा लाभ होणार आहे.यामुळे येथील गावकर्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असुन यामुळे यंदा रब्बी हंगामास गती मिळणार आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola There will be benefits in recharging the well and increasing the water level