कन्टेंटमेंट झोन विरोधात व्यापारी रस्त्यावर, साखळी उपोषणाचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.याबाबत लोकप्रतिनिधी हे देखील या विषयाकडे लक्ष देत नसल्याने  न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न व्यापार्यांवर निर्माण झाला आहे

पारोळा : गेल्या अडीच ते तीन महीन्यापासुन बाजारपेठ बंद असल्याने मोठे व छोटे व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.इतर तालुक्यात कोरोना वाढला असतांना सुध्दा तेथील बाजारपेठ सुरु आहेत.मात्र पारोळ्यातील व्यापार्यांवर हा अन्याय का? असा सवाल करित कन्टेंटमेन्ट झोन उठविणेकामी व्यापारी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असुन न्याय न मिळाल्यास 26 जुन पासुन जुन्या तहसिलवर उपोषण करण्याचा इशारा व्यापारी महामंडळाने निवेदनातुन दिला आहे.

कन्टेंटमेन झोन निघावा यासाठी व्यापारी यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करुन देखील मार्ग निघत नसल्याने शेवटी व्यापारी हे रस्त्यावर येत आक्रमक भुमिका घेतली.यावेळी तहसिल कार्यालयात व्यापारी महामंडळाने झोन उठविणेकामी तहसिलदार यांना निवेदन दिले.जिल्हयात कोरोनाचा कहर वाढत आहे.मात्र तेथील बाजारपेठ सुरळीत आहे.परंतु गेल्या 25 दिवसापासुन मुख्ख बाजारपेठ कन्टेंटमेन्ट झोन मध्ये आल्याने सर्वच दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.याबाबत लोकप्रतिनिधी हे देखील या विषयाकडे लक्ष देत नसल्याने  न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न व्यापार्यांवर निर्माण झाला आहे.
यावेळी तहसिलदार अनिल गवांदे व मुख्खाधिकारी विजयकुमार मुंडे यांच्याकडे व्यापार्यांनी व्यथा मांडली मात्र झोन बाबतचा अधिकार हा जिल्हाधिकारी यांच्याकडे  असल्याचे सांगितल्याने आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्याचे अधिकारी यांनी सांगितले.

दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडेही न्याय न मिळाल्यास झोन मधील व्यापारी हे जुन्या तहसिल कार्यालयात साखळी उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.साखळी उपोषण करणेकामी कापड व्यापारी असोशिएन,किराणा व्यापारी,भांडे व्यापारी,फुट वेअर,सोने चांदी,हाॅटेल रेस्टारंट,सलुन व्यावसायिक, कटलरी व्यवसायिक, इलेक्ट्रानिक, सायकल असोशिएन,प्रिटींग प्रेस असोशिएशन,तसेच इतर अनेक व्यापारी तथा व्यावसायिकांनी निवेदनातुन कळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola Traders on the street against the content zone