पारोळ्यात बारावीच्या विद्यार्थ्याची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

संजय पाटील 
Tuesday, 8 September 2020

अमळनेर रस्त्यालगत असलेल्या अंबिका दूध डेअरीजवळील विहिरीत आढळून आला. त्यास पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

परोळा  : येथे बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. ७) रात्री साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, त्याचे आत्महत्या का केली, याचा उलगडा होऊ शकलेला नाही. 

नीरज भरत चौधरी (वय १७) हा येथील एनईएस हायस्कूलमध्ये बारावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. तो सोमवारी (ता. ७) रात्री आठच्या सुमारास बाहेरुन फिरुन येतो, असे सांगून घरातून निघाला. उशिर झाला तरी नीरज घरी न आल्याने त्याचा शोध सुरू सर्वत्र सुर केला.

 

अन तो सापडला विहिरीत

नीरजचा शोध सुरू असतांना अमळनेर रस्त्यालगत असलेल्या अंबिका दूध डेअरीजवळील विहिरीत आढळून आला. त्यास पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार असून, तो भरत नामदेव चौधरी यांचा मुलगा आहे. या घटनेबाबत पारोळा पोलिसांत विनोद चौधरी यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी बापूराव पाटील तपास करीत आहे. 

मित्रांमध्ये तो होता मनमिळावू 

नीरज चौधरी हा हुशार व मनमिळावू स्वभावाचा होता. त्याचा मोठा मित्र परिवार आहे. त्याच्या मित्रांनी व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवून नीरजला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola twelth standard student committed suicide by jumping into a well