esakal | पारोळा येथे दलित तरुणीवर अत्याचार प्रकरणी विविध संघटनांचा निषेध 
sakal

बोलून बातमी शोधा

पारोळा येथे दलित तरुणीवर अत्याचार प्रकरणी विविध संघटनांचा निषेध 

घटना निंदनीय असून कोणत्याही समाजाच्या महिला,भगिनी वर अन्याय ,अत्याचार सहन केला जाणार नाही, आरोपींना फाशीची शिक्षा झाल्या शिवाय आंदोलने सुरू राहील.

पारोळा येथे दलित तरुणीवर अत्याचार प्रकरणी विविध संघटनांचा निषेध 

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा : तालुक्यातील  20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,मनोधैर्य योजनेच्या माध्यमातुन पिडीत कुटुंबियांना 10 लाखाची मदतीसाठी पाठपुरावा करावा,पिडीत कुटुंबियांना पोलिस संरक्षण द्यावे या मागणी साठी राष्ट्रवादी महीला काँग्रेस,महीला भाजपासह विविध संघटनांनी निषेध मोर्चा काढून पो नि लीलाधर कानडे व तहसिलदार अनिल गवांदे यांना मागण्यांचे निवेदन दिले. 


सकाळी 11 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ शेकडो कार्यकर्ते एकत्र येवुन यात, भीम आर्मी,वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,पीपल्स रिपबल्कीन पार्टी,चर्मकार संघटना,वाल्मिकी समाज  संघटना,अ. भा. बंजारा सेना, एकलव्य संघटना, मल्हार सेना,बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय दलित प्यंथर अश्या सामाजिक संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सुनील जाधव यांनी झालेली घटना निंदनीय असून कोणत्याही समाजाच्या महिला,भगिनी वर अन्याय ,अत्याचार सहन केला जाणार नाही, आरोपींना फाशीची शिक्षा झाल्या शिवाय आंदोलने सुरू राहतील असा इशारा यावेळी त्यांनी दिला .या नंतर रा. म. 6 वर प्रचंड घोषणा देत सदर मोर्चा पोलीस स्टेशन येथे धडकून यावेळी पो नि ना निवेदन देण्यात आले यावेळी दीपक अनुष्ठान,गौतम जावळे, दयाराम मोरे,जितेंद्र वानखेडे,अँड स्वाती शिंदे, विशाल नरवाडे,तेजु नरवाडे यांच्यासह सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तर राणीलक्ष्मीबाई महाविद्यालया कडूनही त्यांच्या विद्यार्थिनी वर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून निवेदन देण्यात आले यावेळी प्रा संजय भावसार, प्रा. जे. बी. पाटील व विद्यार्थिनी उपस्थित होत्या .सदर मोर्चच्या साठी जळगाव येथून विशेष पोलिसांचा ताफा तैनात केला गेला होता.

जिल्हा राष्ट्रवादीकडुन तीव्र निषेध 
तालुक्यातील घटना ही संतापजनक असुन गैरकृत्य करणार्या आरोपींची कुठलीही गय न करता खटला फास्ट ट्रँक न्यायालयात चालवुन कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी महीला जिल्हा संघटनेकडुन करण्यात आली.यावेळी मागणीचे निवेदन देण्यात येवुन घटनेचा निषेध करण्यात आला.
यावेळी महीला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील,मिनाक्षी चव्हाण,जयश्री पाटील,अँड माधुरी पाटील,सुवर्णा पाटील,सुनंदा शेंडे,यांचेसह जि प सदस्य रोहन पाटील,तालुकाध्यक्ष यशवंत पाटील,योगेश रोकडे,लोकेश पवार,अक्षय पाटील,दिलीप पाटील यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

महीला भाजपाचा तहसिवर मोर्चा 
तालुक्यातील येथील 20वर्षीय मुलीचे अपहरण व क्रुर अत्याचार करणार्या घटनेचा निषेध व आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी महीला भाजपा पदाधिकारी यांनी तहसिलदार अनिल गवांदे यांना निवेदन दिले.यावेळी तालुकाध्यक्ष अँड कृतिका आफ्रे,उपनगराध्यक्ष जयश्री बडगुजर,नगरसेविका रेखा चौधरी,वैशाली मेटकर,कल्पना महाजन यासह तालुकाध्यक्ष अँड अतुल मोरे,भावडु राजपुत,समीर वैद्य,धीरज महाजन,रविंद्र पाटील,सचिन गुजराथी,संकेत दाणेज यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top