भावी इंजिनिअर कर्ज बाजारी झाला, आणि थंड डोक्याने आजोबा-आजीचा त्याने केला घात

भावी इंजिनिअर कर्ज बाजारी झाला, आणि थंड डोक्याने आजोबा-आजीचा त्याने केला घात
Updated on

चिनावल/सावदा : रोझोदा येथील निवृत्त ग्रामविस्तार अधिकारी ओंकार पांडुरंग भारंबे (वय ८०) व त्यांची पत्नी सुमन ओंकार भारंबे (वय ७५) या वृद्ध दाम्पत्याची गुरुवारी (१० सप्टेंबर) भरदिवसा हत्या झाली. या घटनेच्या तपासाची चक्रे वेगाने फिरवीत येथील पोलिसांनी यातील संशयित परेश भारंबे (वय ३२, रा. रोझोदा) यास अटक केली. त्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 


परेश हा मृत वृद्ध दाम्पत्य भारंबे यांच्याच शेजारी राहतो. तो कर्जबाजारी झाल्याने चोरीच्या उद्देशाने भारंबे यांच्या घरात घुसला. पण, या वेळी वृद्धांना जाग आली. आपले बिंग फुटेल, या भीतीने त्याने वृद्ध भारंबे दाम्पत्यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घुण हत्या केली. घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, पोलिस उपअधीक्षक भाग्यश्री नटावके, विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे आदींनी गुरुवारीच रोझोदा येथे भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देवेंद्र पाटील, जगदीश पाटील, सपकाळे, संजय चौधरी यांनी तपासाची चक्रे फिरविली.

श्वानाने दाखविला रस्ता

तपास सुरू असतांना पोलिसांनी त्यांचा आणलेला श्वान घटना स्थळी आणले. श्वानाने माग घेत संशयित ज्या शेतात दडून बसला होता, त्याबाबतची माहिती मिळाली आणि बारा तासांत पोलिसांनी संशयित परेश भारंबेला अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत असून, जनतेत समाधान व्यक्त होत आहे. 

नातूच निघाला मारेकरी

संशयित हा मृत वृद्ध दाम्पत्याचा चुलत नातू असून, तो त्यांची कामेही करून द्यायचा. त्यामुळे त्याचे या दाम्पत्याच्या घरात येणे-जाणे होतेच. त्यामुळे त्यास घरातील सर्व माहिती असायची. गुरुवारी त्याने चोरी करून चलनी नोटा घेऊन पळ काढत असताना वृद्धांना जाग आली आणि त्याने त्यांची हत्या केली.  

 जळगाव
संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com