'माझी वसुंधरा' अभियानात चिनावल ग्रामपंचायत तिसऱ्या स्थानी

ग्रामपंचायत कार्यालयात या कार्यक्रमाच्या सहभागाची आणि थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली
'माझी वसुंधरा' अभियानात चिनावल ग्रामपंचायत तिसऱ्या स्थानी

रावेर / चिनावल : महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) पर्यावरण मंत्रालयामार्फत (Ministry of Environment) आयोजित 'माझी वसुंधरा' (mazi vasundhara Campaign) या अभियानात तालुक्यातील चिनावल ग्रामपंचायतीला ( Chinawal Gram Panchayat) राज्यस्तरीय तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार (Award) जाहीर करण्यात येऊन तो वितरित करण्यात आला.

(chinawal gram panchayat mazi vasundhara campaign state level third prize)

'माझी वसुंधरा' अभियानात चिनावल ग्रामपंचायत तिसऱ्या स्थानी
जळगाव जिल्ह्यात बारा लाख वृक्ष लावले जाणार !

२ ऑक्टोबर ते ३१ मार्च दरम्यान या ग्रामपंचायतीने विविध प्रकारचे उपक्रम राबविले होते. आज (ता ५) झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, या विभागाच्या सचिव मनिषा पाटणकर- म्हैसकर आदींच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामपंचायत कार्यालयात थेट प्रेक्षपण

चिनावल येथील ग्रामपंचायत कार्यालयात या कार्यक्रमाच्या सहभागाची आणि थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. सरपंच भावना बोरोले, ग्राम विकास अधिकारी संतोष सपकाळे, तालुक्याच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी श्री मुश्रीफ यांच्या हस्ते हा पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला.

'माझी वसुंधरा' अभियानात चिनावल ग्रामपंचायत तिसऱ्या स्थानी
धुळे जिल्ह्यात १२२ गावांनी कोरोनाला थोपविले वेशीबाहेर

यावेळी चिनावलच्या तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष योगेश बोरोले,ग्रामपंचायत सदस्य सागर भारंबे,कविता किरंगे, धनश्री नेमाडे, पोलिस पाटील निलेश नेमाडे व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com