रावेर येथे कोंबड्या दगावल्या; पशुपाल्यांमध्ये चिंतेचे वातावरण 

प्रविण धुंदले
Saturday, 16 January 2021

कोंबड्याच्या मृत्यूचे कारण समजु शकले नसून घसरलेले तापमान, काही खाल्ल्यामुळे होणारी बाधा, की काही प्रादुर्भावाने कोंबड्या मेल्या हे समजलेले नाही. 

खिर्डी :  तालुक्यातील खिर्डी खुर्द येथे गेल्या चार दिवसांपूर्वी काही कोंबड्या दगवल्याने पक्षी पाल्यांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा प्रादुर्भाव की इतर काही कारण यात संभ्रम निर्माण झाले आहे.

सध्या महाराष्ट्रात बार्डफ्ल्यू या रोगाने थैमान घालण्यास सुरुवात केली असून खिर्डी खुर्द येथे एक दिवसाच्या दोन ते ती कोंबड्या चा मृत्यू होत आहे आता पर्यत सात ते आठ कोंबड्या.मृत्यू झाला आहे. मात्र कोंबड्याच्या मृत्यूचे कारण समजु शकले नसून घसरलेले तापमान, काही खाल्ल्यामुळे होणारी बाधा, की काही प्रादुर्भावाने कोंबड्या मेल्या हे समजलेले नाही. प्रशासनाने खिर्डी सह परिसरात याचा आढावा घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी मांगणी कुंकुट पालन व्यवसायीकांडून होत आहे.

माहिती पडताच पशु वैद्यकीय अधिकारी दाखल

खिर्डी खुर्द येथे बलवाडी रोडालागत दोन कोंबड्या मृत्यू अवस्थेत आढल्या होत्या. त्याची माहिती नागरिकांनी पशुवैधकीय अधिकाऱ्यांना दिली असता खिर्डी येथे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्मचार्यांसह भेट देऊन माहिती घेतली असता त्यावेळेस मृत्यूअवस्थेत आढळलेल्या कोंबड्याच्या व्हीललेव्हाट लावण्यात आला होता.त्यामुळे हा प्रदुभाव की अजून काही हे निश्चित करण्यात आलेले नाही.तरी पशुपाल्यांनी या पुढे असे आढळल्यास पशुपल्ल्यांनी स्वतः मृत्यू कोंबड्यांचा व्हीललेव्हाट न लावता पशुवैधकीय दवाखान्यात याची माहिती द्यावी असे पशुवैधकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

तीन-चार दिवसांपूर्वी आम्हाला मृत्यू कोंबड्यांची माहिती मिळाली असता आम्ही तात्काळ तिथे गेल्यावर मृत कोंबड्यांचा व्हिलेव्हाट लावल्यामुळे त्याची माहिती घेणे कठीण झाले असून त्याठिकाणी असलेल्या जिवंत कोंड्यांना आम्ही औषधी दिली.या पुढे अश्या प्रकारे पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास पक्षी पाल्यांनी परस्पर रोडावर न टाकता पशुवैधकीय दवाखान्यात माहिती द्यावी
- डॉ संतोष वडजे (पशु वैधकीय अधिकारी खिर्डी ता रावेर)

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver khirdi village sudden death hens