खिर्डीच्या उत्कर्षने..एकदा नव्हे दुसऱ्यांदा केला वर्ल्ड रेकॉर्ड !

काव्यसंग्रहात जगातील दोन हजाराच्या संख्येच्या वर लेखकांनी सहभाग नोंदवला होता
खिर्डीच्या उत्कर्षने..एकदा नव्हे दुसऱ्यांदा केला वर्ल्ड रेकॉर्ड !
Updated on



खिर्डी (ता. रावेर) : खिर्डीच्या उत्कर्ष किरण नेमाडे या ग्रामीण भागातील तरुणाने लाॅकडाउनचा (Lockdown) सदउपयोग करतात गेल्या काही महिन्यांपूर्वी सर्वात तरुण संगीतकार म्हणून तबला वादनामध्ये गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड (Guinness Book) मधे लंडनचा (London) रेकॉर्ड मोडला होता. त्यानंतरच्या यशानंतर यशाच्या शिखराकडे वाटचाल करत तब्बल दुसऱ्यांदा आपल्या लेखनातून स्टारडस्ट या काव्यसंग्रहात एक लेख दोन कविता जगात उत्कृष्ट असे सहा मानांकन पुन्हा मिळवून वर्ल्ड रेकाॅर्ड (World record) केला आहे.

(khirdi village yong boy world record in guinness book for second time)

भारतीय कॉर्डिनेटर हेमंत बनसाळ मुख्य लेखक दिल्ली यांनी त्याला सहभाग होण्याची संधी दिल्याने उत्कर्ष याने आपल्या लेखनाच्या आवडीतून एक लेख दोन कविता एक मराठी आणि इंग्रजी या भाषातून जगातील होत असलेल्या लेखन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. यात निवड झालेल्या काव्यसंग्रहात जगातील दोन हजाराच्या संख्येच्या वर लेखकांनी सहभाग नोंदवला होता.

सहा मानांकन

उत्कर्षाच्या या लिखाणाला जगातील उत्कृष्ट असे सहा मानांकन पुन्हा मिळाले आहे. बालपणापासूनच आजी आजोबा यांच्यापासून नाटक कविता काव्य संग्रह वाचन यातून प्रेरित असलेल्या उत्कर्ष ने पुन्हा एकदा राज्यात नव्हे देशात नव्हे तर जगातच नाव उंचावले आहे सर्वत्र कौतुक होत असून तृरूणान साठी आदर्श निर्माण केला आहे.

स्वतःचा छंद म्हणून उत्कर्ष ने तो जोपासला आणि विश्वविक्रम झाल्याचे. समजल्यावर कुटुंबात कळविले आम्हाला अतिशय आनंद झाला उत्कर्ष ने दुसऱ्यांदा गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड केल्यामुळे त्याचा अभिमान ही वाटतो
किरण नेमाडे- वडील


उत्कर्षला रेकॉर्डमधे झालेली नोंद खालील प्रमाणे

- गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड
- ब्रावो इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड
- इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड
- इंटरनॅशनल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड
- रॉयल सक्सेस बुक ऑफ रेकॉर्ड
- एक्सलुसिव इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com