१५ दिवसात रावेर तालुक्यात केळीचे ७५ कोटीचे नुकसान !

केळी व घरांच्या पडझडीचा अंतिम अहवाल शासनाला सादर करण्यात आला.
Banana crop
Banana cropBanana crop

रावेर : रावेर तालुक्यात 'मे' च्या शेवटच्या आठवड्यात व 'जून'च्या सुरुवातीस वादळी (storm) पावसाने (Rain) तब्बल पाच वेळेस झोडपले. यामुळे अडीच हजार शेतकऱ्यांच्या (Farmer) १८९६.७७ हेक्टर क्षेत्रातील केळी पिके (Banana Crop) जमिन दोस्त होऊन ७४ कोटी,४० लाख ७६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंतिम पंचनाम्याचा अहवाल शासनाला सादर (Report to the Government) करण्यात आला आहे. शासनाने त्वरीत नुकसान भरपाई शेतकर्यांना द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

(

Banana crop
अमळनेर तालुक्यातील आठशे लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश

तालुक्यात २५ ते ३० मे दरम्यान चार वेळा व २ 'मे' रोजी वादळी पावसामुळे केळी पिकाचे नुकसान झाले . दरम्यान कृषी व महसूल विभागात रिक्त पदे असल्यामुळे अंतिम नुकसानिच्या अहवालास उशीर झाला. दोन्ही विभागा कडून आज तालुक्यातील केळी व घरांच्या पडझडीचा अंतिम अहवाल शासनाला सादर करण्यात आला.

५० गावातील केळी

तालुक्यातील सुमारे ५० गावातील शेती शिवारातील २ हजार ४८८ शेतकर्‍यांच्या १हजार ८९६.७७ हेक्टर क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या केळी पिकांचे सुमारे ७४ कोटी,४० लाख ७६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल आज जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षक व शासनाला पाठवण्यात आला .

Banana crop
Banana cropBanana crop

एकुण गावे,शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र, एकूण नुकसान असे -
- २५ मे = गावे -३ , शेतकरी -४६, बधित क्षेत्र - १८.९९, नुकसान - ७२ लाख ,७६ हजार रुपये .
-२७ मे , गावे - २३ , शेतकरी - १६११, बधित क्षेत्र - ११६४.२२, नुकसान - ४६ कोटी, ५६ लाख ,८८ हजार रुपये .
- २९ मे , गावे - १३ , शेतकरी - ११४, बधित क्षेत्र - ६५.७८ , नुकसान - २ कोटी,६३ लाख, १२ हजार रुपये .
- ३० मे , गावे - ५ , शेतकरी -८४, बधित क्षेत्र - ३५.७८, नुकसान - १ कोटी,४३ लाख ,१२ हजार रुपये .
-२ जून - गावे - ९, शेतकरी -६३३, बाधित क्षेत्र- ६१२, नुकसान २४ कोटी ४८ लाख,

Banana crop
कर्ज काढून देण्यासाठी लाच मागणाऱ्या प्रकल्प अधिकारी गजाआड

वादळी तडाख्यामुळे घरांची पडझड
रावेर तालुक्यात २७,२८ व ३० मे तसेच २ जून रोजी वादळी पावसामुळे ४७८ पक्की घरे, ३१६ कच्ची घरे,१६ झोपड्या असे एकुण ८२५ घरे यात ७२७ अधिकृत व ७८ अतिक्रमित घरे एकुण पंचनामा निहाय नुकसान ९३ लाख,७८ लाख,७०० रुपये . शासन नुसार नुकसान देय -४३ लाख,६२ हजार रूपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com