ठेकेदाराच्या  मुदतवाढीवरून रावेर पालिका सभेत गदारोळ  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठेकेदाराच्या  मुदतवाढीवरून रावेर पालिका सभेत गदारोळ 

शहरात ठिकठिकाणी काँक्रिटीकरण आणि गटारीचे बांधकाम करणे, पालिकेचे जन्म-मृत्यू उपनिबंधक लवकरच निवृत्त होत असल्यामुळे त्यांचा पदभार अन्य कर्मचाऱ्याकडे हस्तांतरित करणे.

ठेकेदाराच्या  मुदतवाढीवरून रावेर पालिका सभेत गदारोळ 

रावेर : येथील पालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत एकाच ठेकेदाराला पुनःपुन्हा विविध कामांना मुदतवाढ देण्याचा प्रश्न सभेत गाजला. या वेळी झालेल्या गोंधळात सर्व ३१ विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

आवश्य वाचा-  लॉकडाउनमध्ये रेल्वेने बदलला उत्पन्नाचा ‘ट्रॅक’ ! -

नगराध्यक्ष दारा मोहम्मद जाफर मोहम्मद यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात सकाळी अकराला ही सर्वसाधारण सभा झाली. पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला शेड बांधणे, या प्रकल्पाभोवती संरक्षक भिंत बांधणे, शहरात ठिकठिकाणी काँक्रिटीकरण आणि गटारीचे बांधकाम करणे, पालिकेचे जन्म-मृत्यू उपनिबंधक लवकरच निवृत्त होत असल्यामुळे त्यांचा पदभार अन्य कर्मचाऱ्याकडे हस्तांतरित करणे, साने गुरुजी बालोद्यान परिसरातील दुकाने लिलाव पद्धतीने देणे, तसेच शहरातील माजी सैनिकांची घरपट्टी पूर्णपणे माफ करणे आदी विषयांवर चर्चा होऊन एकमताने मंजूर करण्यात आले. 


विषय क्रमांक सहावर पालिकेच्या जुन्या इमारतीच्या जागेवर सपाटीकरण करणे व संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला मुदतवाढ देण्याचा विषय होता. नगरसेवक यशवंत दलाल यांनी या विषयावर हरकत घेतली. विविध कामांना पुनःपुन्हा त्याच ठेकेदारांना नेमून पुन्हा मुदतवाढ द्यावी लागत आहे. त्याऐवजी अन्य ठेकेदारांना कामे का देण्यात येऊ नयेत, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी या विषयाला हरकत घेतली. या ऑनलाइन बैठकीत नगरसेवक प्रल्हाद महाजन, ललिता बर्वे, जगदीश घेटे, संगीता महाजन, आसिफ मोहम्मद, प्रकाश अग्रवाल, संगीता वाणी, संगीता अग्रवाल, सादिक मोहम्मद, पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे आदी उपस्थित होते. 

संपादन- भूषण श्रीखंडे जळगाव
 

loading image
go to top