
मानपक्षी जाहीर करण्यात यावा अशी मागणी चातक निसर्ग संवर्धन संस्थेकडून करण्यात आली आहे.
खिर्डी (ता.रावेर): येथून जवळच असलेल्या हतनूर जलाशयावर हिवाळ्याच्या महिन्यांत दरवर्षी परदेशी पाहुणे पक्षी दाखल होतात. चातक निसर्ग संस्थेकडून येणाऱ्या सर्व पक्ष्यांच्या नोंदी ठेवल्या जातात. जलाशयावर युरोपमधून स्थलांतरित मोठ्या लालसरी बदकांची संख्या जास्त असल्याने हतनूर धरण जलाशयाचा मोठ्या लालसरी बदकाला मानपक्षी जाहीर करण्यात यावा अशी मागणी चातक निसर्ग संवर्धन संस्थेकडून करण्यात आली आहे. यावेळी चातक संस्थेने बैठक घेवून या मागणीसाठी ठराव करन लालसरी बदक ला मानपक्षी साठी शिक्काबोर्तब करण्यात आले यावेळी संस्थेचे पक्षी मित्र उपस्थित होते सदर मागणी जळगाव वन विभागाकड़े करण्यात आली आहे
जैवविविधतेने महत्वपूर्ण हतनुर जलाशय
जळगाव जिल्ह्यातील जैवविविधतेने संपन्न असलेले हतनुर जलाशयाला ललासरी बदकाला मानपक्षी जाहिर केल्यास महाराष्ट्रात जलशयाची नवीन ओळख तयार होईल.
लालसरी बदक हे पक्षी युरोपमधील
लालसरी बदक हे पक्षी युरोपमधील सखल दलदल व तलाव त्याचे प्रजनन वस्ती आहे आणि ते काळ्या समुद्रावरील मैदान व अर्ध वाळवंटातून मध्य आशिया व मंगोलियापर्यंत पसरले आहे. हे काहीसे स्थलांतरित आहे आणि उत्तर दक्षिण आफ्रिकेपर्यंत दक्षिणेकडे आहेत.
संपादन- भूषण श्रीखंडे