esakal | खिर्डीचा उत्‍कर्ष गिनीज बुक रेकॉर्डवर; अठरा वर्षापुर्वीचा रेकॉर्ड काढला मोडीत
sakal

बोलून बातमी शोधा

guinness book of world record

काही वेगळा विक्रम करत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरण्याचे स्‍वप्न असते. हे स्‍वप्न सर्वांनाच पुर्ण करता येईल असे नाही. पण एका लहानशा गावात राहणाऱ्या तरूणाने जगातील सर्वात तरूण संगीतकार म्‍हणून आपले नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदले आहे.

खिर्डीचा उत्‍कर्ष गिनीज बुक रेकॉर्डवर; अठरा वर्षापुर्वीचा रेकॉर्ड काढला मोडीत

sakal_logo
By
प्रविण धुंदले

खिर्डी (ता. रावेर) : खिर्डी गावातील तरूण उत्‍कर्ष किरण नेमाडे हा महाराष्‍ट्रातील पहिला तरूण संगीतकार ठरला आहे. त्‍याने गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव रचत जळगाव जिल्‍ह्‍याचे नाव यात कोरले आहे. त्‍याने हंग्रीच्या अदम लोरींज याने रचलेला रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
खिर्डी गावातील येथील शेतकरी किरण प्रकाश नेमाडे व ग्रामपंचायत सदस्या मोहिनी नेमाडे यांचा मुलगा असुन तो फैजपूर येथील सतपंथ कला केंद्रामध्ये संगीतचे शिक्षण घेत आहे. त्‍याच्या यशाबद्दल महामंडलेश्वर स्वामी जनार्धन हरी महाराज, संगीत शिक्षक उत्पल तसेच सर्व गावकऱ्यांनी अभिनंदन केले. लहानपणापासुनच संगीताची आवड असल्यामुळे व आई- वडील तसेच गुरुंच्या मार्गदर्शनामुळे मला संगीत क्षेत्रात गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मान मिळविता आल्‍याचे उत्‍कृर्षने सांगितले.

ऑनलाईन स्‍पर्धेतून केला विक्रम
संगीत नाटक अकादमीतर्फे 15 नोव्हेंबरला आयोजित ऑनलाइन स्पर्धेत हा विक्रम उत्कर्षने रचला; आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले. 

१८ वर्षापुर्वीचा रेकॉर्ड मोडीत
या आधी 2002 मध्ये हंग्री देशातील अदम लोरिंज याने हा विक्रम रचला होता. पण 92 मिनिटांच्या सरासरीनुसार उत्कर्षने हा विक्रम जळगाव जिल्हयात मोडला आणि महाराष्ट्रातला पहिला वैयक्तिक सर्वात तरुण संगीतकार ठरला. उत्कर्ष किरण नेमाडे यांनी 2002 मध्ये हंग्रीच्या अदम लोरींज़ याने रचलेला सर्वात तरूण संगितकारचा (Youngest Composer for Musical) विक्रम मोडून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव रचले.

ऑस्‍करसाठीही होते नामांकन
उत्कर्षला या आधी म्‍हणजे 2018 मध्ये सर्वोत्‍कृष्‍ट तबला वादक बालकलाकार म्हणून ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स ऑफ आर्ट अँड सायन्सतर्फेच संगीत नाटक अकादमीमध्ये मान मिळाला होता.

संपादन ः राजेश सोनवणे