esakal | काय सांगतात ! चक्क आमदारांनाच भाजी खरेदीसाठी जावे लागले बाजारात
sakal

बोलून बातमी शोधा

 काय सांगतात ! चक्क आमदारांनाच भाजी खरेदीसाठी जावे लागले बाजारात

आमदार चौधरी यांनी सावदा येथील आठवडे बाजारात जावून कुटुंबासाठी भाजी खरेदी करण्याचा आनंद घेतला.

काय सांगतात ! चक्क आमदारांनाच भाजी खरेदीसाठी जावे लागले बाजारात

sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : दिवाळीनिमित्त घरातील सर्वच कर्मचारी सदस्य आपल्या घरी सुटीवर गेल्याने आमदार शिरीष चौधरी यांनी रविवारी सावदा येथील आठवडे बाजारातून कुटुंबासाठी भाजी खरेदी करण्याचा आनंद घेतला. आमदार चौधरी यांच्या कुटुंबात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी दिवाळीनिमित्त सुट्टी दिली होती 

आवश्य वाचा- शंखनादाने श्री बालाजी मंदीर, पाडवा पहाटने झपाटभवानी मंदीर भक्तांसाठी खुले -


आमदार चौधरी यांच्या कुटुंबात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी दिवाळीनिमित्त सुट्टी दिली होती आणि घरी त्यांच्या सुविद्य पत्नी प्राचार्या डॉ अरुणा चौधरी यांनी भाजी संपली असल्याचे आमदार चौधरी यांना सांगितले. आमदार चौधरी यांनी सावदा येथील आठवडे बाजारात जावून कुटुंबासाठी भाजी खरेदी करण्याचा आनंद घेतला.

चक्क आमदार भाजी घेण्यासाठी बाजारात 

आमदार चौधरी यांनी सावदा येथील आठवडा बाजारातून मुळे, काकडी, टमाटर, मठ, पालक, कोथिंबीर आदी भाज्या खरेदी केल्या. यावेळी बाजारातील असंख्य लोक उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहत होते.

वाचा - प्रसिध्द सराफ व्यवसायीक रतनलालजी बाफना यांचे निधन -

भाजी खरेदी करतांना आनंद वाटला

याबाबत आमदार चौधरी यांनी सांगितले की, रस्त्याने अनेकदा चांगली भाजी अगर चांगली फळे दिसली तर ती मी कुटुंबासाठी घेत असतो मात्र आठवडे बाजारात मात्र आपण अनेक वर्षानंतर गेलो. भाजी बाजारात भाजी घ्यायला गेलो तर अनेकदा भाजीविक्रेते  आपल्याकडून पैसे द्यायला नकार देतात या संकोचाने आपण भाजी बाजारात सहसा जात नाही. मात्र कुटुंबासाठी अशी खरेदी करायला  आवडते. मतदार संघ बरोबरच कुटुंबाचीही जबाबदारी आपल्यावर आहे यामुळे भाजी खरेदी करताना आनंद वाटला असे ते म्हणाले.

संपादन- भूषण श्रीखंडे