
घराजवळच राहणाऱ्या अनिल सुरेश घोरपडे हा पाठीमागून आला. त्याने माझे तोंड रुमालाने घट्ट दाबून मला घरासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या ओट्यावर नेऊन मला म्हणाला की, तुझ्यावर माझा बऱ्याच दिवसांपासून डोळा होता.
पहूर (ता. जामनेर) : फार रात्रही झाली नव्हती. रात्रीचे अवघे साडेदहा वाजले होते. घरातील सारे गाढ झोपेत असताना सतरा वर्षीय युवती लघुशंकेसाठी उठली. नेमकी हिच संधी साधत शेजारी राहणारा नराधम तिच्या पाठीमागून आला अन् तोंडाला रूमाल लावून तिला गावाच्या बाहेर मोकळ्या मागेवर घेवून जात अतिप्रसंग केला. शिवाय मारहाण करत तिला पाण्याच्या डबक्यात फेकून दिल्याचा धक्कादायक घटना शेंगोळा येथे घडली.
शेंगोळा (ता. जामनेर) येथील एक सतरा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर गावातीलच नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना शनिवारी (ता. 25 ) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहीती मिळताच पहूर पोलीस पोलीसांनी घटनास्थळ गाठत आरोपीस अवघ्या काही तासात पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बऱ्याच दिवसांपासून तुझ्यावर डोळा म्हणत..
पिडीतेने पहूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शनिवारी (ता. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास लघूशंकेसाठी उठली. त्यावेळी आई व घरातील लोक झोपलेले होते. यामुळे घरासमोरील अंगणात लघुशंका करण्यासाठी गेली. लघुशंका झाल्यानंतर घराजवळच राहणाऱ्या अनिल सुरेश घोरपडे हा पाठीमागून आला. त्याने माझे तोंड रुमालाने घट्ट दाबून मला घरासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या ओट्यावर नेऊन मला म्हणाला की, तुझ्यावर माझा बऱ्याच दिवसांपासून डोळा होता. असे म्हणत त्याने चापटा बुक्क्यांनी मारहाण करीत माझ्यावर अतिप्रसंग केला. तोंडावर रुमाल बांधलेला असल्याने आरडाओरडा करू शकले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अन् पाण्याच्या डबक्यात फेकले
अतिप्रसंग केल्यानंतर माझ्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर कायमचा काटा काढील, असा दम देत त्याने काठीने मारहाण करत पाण्याच्या डबक्यात लोटून दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे बेशुद्ध पडली होती. काही वेळानंतर शुद्ध आल्यावर जोरजोरात आईला हाका मारल्यानंतर आईला जाग आली. यानंतर आई जवळ येताच सदरची सर्व हकीकत तिला सांगितली. या प्रकरणी पीडितेच्या आईने तत्काळ पहूर पोलिस ठाण्याशी संपर्क केला. पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी घटनास्थळ गाठून आरोपीस ताब्यात घेतले.
संपादन : राजेश सोनवणे