वादग्रस्त शायर मुनव्वर राणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shire Munavvar Rana

वादग्रस्त शायर मुनव्वर राणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल

जळगाव- एका हिंदी वृत्त वाहिनीवर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शायर मुनव्वर राणा यांची अफगणिस्तान (Afghanistan) देशावरील सद्याच्या परिस्थीतीच्या मुद्यावरील मुलाखती दरम्यान शायर मुनव्वर राणा यांनी वादग्रस्त विधान केल्याने जळगाव येथील भाजपचे नगरसेवक (BJP corporator)कैलास सोनवणे यांनी शनिपेठ पोलिस (Jalgaon Shanipeth police) ठाण्यात शायर मुनव्वर राणा यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: हतनुर पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टिमुळे धरणाचे ४१ दरवाजे उघडले. 

अफगाणिस्तान देशावर तालिबान्यांनी ताबा घेतला असून या मुद्यावरून उत्तर प्रदेशातील शायर मूनव्वर राणा यांची एका हिंदी वृत्त वाहिनीवर मुलाखत झाली. या मुलाखती दरम्यान त्यांनी वादग्रस्त विधान केल्याने सर्व माध्यमातून यावर टिका देखील झाली. त्यात आज या वादग्रस्त विधानाबाबद जळगाव येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी जळगाव येथील शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: तर..मंत्र्यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे-राज्यमंत्री डाॅ. पवार

असे आहेत शायर मुनव्व राणा वादग्रस्त

मुनावर यांनी अनेक गझल प्रकाशित केल्या आहेत, त्यांची लेखनाची एक वेगळी शैली आहे. परंतू ऑक्टोबर २०२० मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी राणा यांच्यावर धार्मिक गटांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर आता अफगणिस्तान तालिबाने ताब्यात घेतल्याने त्याचे समर्थन करून तालिबानचे त्यांनी समर्थन एका हिंदी वृत्त वाहिनीच्या मुलाखतीला दिले आहे.

Web Title: Marathi News Shire Munavvar Rana Again Jalgaon Police Charged

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..