सावधान ः सर्प येताहेत बिळांबाहेर; सापांना न मारण्याचे सर्पमित्रांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

पावसाळा सुरू झाल्यानंतर साप आढळून येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी सतर्क राहूनच कामे करावीत. शक्य झाल्‍यास पायात बूट असू द्यावेत. सर्प आढळल्यास किंवा सर्पदंश झाल्‍यास कुठल्‍याच मांत्रिकाकडे न जाता, रूग्णावर प्राथमिक उपचार करून दवाखान्यात न्‍यावे. सर्प आढळून आल्‍यास त्‍याला मारून न टाकता, त्‍याच्‍यावर नजर ठेवत तत्‍काळ जवळच्या सर्पमित्रांशी संपर्क साधावा. 
- राजेश ठोंबरे, सर्पतज्ज्ञ तथा मानद वन्यजीव रक्षक, चाळीसगाव 

चाळीसगाव ः जून महिन्‍याचा सुरवातीलाच पावसाला सुरवात झाली आहे. त्‍यामुळे पावसाचे पाणी बिळांमध्ये शिरून सर्प बिळांबाहेर येऊ लागले आहेत. त्यामुळे सर्पमित्रांना येणारे कॉल वाढत आहेत. पावसाळ्यातच सर्पदंशाच्‍या रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्जकता बाळगावी. साप निघाल्यानंतर जवळच्या सर्पमित्रांना कॉल करावा, सापांना मारू नये, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे. 
तालुक्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागात असलेल्या बिळांमध्ये पाणी शिरत असल्याने बिळांमधील साप बाहेर येत आहेत. सर्वसाधारणपणे काही साप बिळांमध्ये तर काही साप अडगळीच्या ठिकाणी निवारा करून राहतात. सापाला केवळ रहायला आणि खायला मिळाले की त्यांची सोय होते. वर्षभरात महाराष्ट्रात किमान बारा ते पंधरा हजार लोकांना सर्पदंश होतो. त्यात चार ते पाच हजार लोकांना जीव गमवावा लागतो. खानदेशात विषारी सापांमध्ये नाग, मन्यार, घोणस, पुरसे या सापांचा तर बिनविषारी सर्पामध्ये चित्रक, कवड्या, धामण, दिवड, गवत्‍या, डुरक्‍या घोणस, मांडोळ व अजगर यासारख्या सापांचा वावर आहे. पावसामुळे बिळांबाहेर साप निघण्याचे प्रमाण वाढते. विशेषतः मोकळ्या प्लॉट परिसरासह नदीकाठच्या भागांमध्ये साप सध्या निघत असल्याचे स्थानिक सर्पमित्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

प्रथमोपचार महत्त्वाचे 
सापांविषयी समाजात गैरसमज असल्याने सापांविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. सर्पदंश झाला म्‍हणजे आता मृत्‍यू येणारच असा समाज असल्याने अनेक जण धास्तीने जीव गमावतात. मात्र, योग्य वेळी योग्य उपचार झाले तर विषारी साप जरी चावला असेल तरी जीव वाचू शकतो. त्यामुळे साप चावल्यानंतर योग्य पद्धतीने केलेले प्रथमोपचार लाख मोलाचे ठरतात, असे येथील सर्पतज्ज्ञ राजेश ठोंबरे यांचे म्हणणे आहे. श्री. ठोंबरे हे सापांविषयी ठिकठिकाणच्या व्याख्यानांद्वारे हाच संदेश देत असतात. 

सर्पदंश झाल्‍यास काय करावे 
- सर्पदंश झाल्यानंतर घाबरून जाऊ नये. 
- ज्याला साप चावला, त्याला मानसिक आधार द्यावा. 
- रुग्णाला श्रम न करू देता शांत बसण्यास सांगावे. 
- संर्पदशं झालेला अवयव हदयाच्या खालच्‍या पातळीवर ठेवावा. 
- जखम हळूवारपणे जंतुनाशकाने स्‍वच्छ करावी. 
- सर्पदंश झालेल्‍या भागाच्‍या वर व खाली आवळपट्टी बांधावी, मात्र ती घट्ट बांधू नये. 
- विषारी सर्पदंशावर ‘एएसव्‍ही’ हेच एकमेव औषध आहे. त्यामुळे तत्काळ दवाखान्यात न्‍यावे. 

जळगाव जिल्ह्यातील सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक 

राजेश ठोंबरे (चाळीसगाव) ९४०३२७९४१६ 
मयूर कदम (चाळीसगाव) ९१५८२४१६८५ 
श्रीकांत भामरे (चाळीसगाव) ७७७४००७०८६ 
बापू कोळी (जैनांबाद, आसोदा) ७७५६८०८५४८ 
ऋषी राजपूत (कोर्ट परिसर, जळगाव) ८०५५३९३९८९ 
चेतन भावसार (का. उ. कोल्हे विद्यालय, जळगाव) :- ९८९०६५३५९५ 
जगदीश बैरागी (हरिविठ्ठल नगर) ९४२०६६२५३१ 
राजेश सोनवणे (हरिविठ्ठल नगर) ८३०८७८८१८४ 
रवींद्र भोई ( जळगाव, पारोळा) ९८५०७१९२२२ 
नीलेश ढाके (गणेश कॉलनी) ८३९०५८१३५८ 
बाळकृष्ण देवरे (शिव कॉलनी) ९०२८३०८३६५ 
वासुदेव वाढे (एमआयडीसी, जळगाव) ९६७३९७०९८० 
शुभम पवार (आशा बाबा नगर):- ८४८५८२३३२९ 
अमोल देशमुख (गणेश कॉलनी, साकेगाव) :९०२९७९१३९६ 
योगेश गालफाडे( शामराव, नगर, जळगाव) ७७०९७७६४४६ 
रवींद्र फालक (जळगाव) ९४२३१८५८३८ 
रवींद्र सोनवणे (जळगाव) ९९२२७७४७१५ 
सुरेंद्र नारखेडे (मेहरूण, जळगाव) ८२७५३४०००५ 
अभिषेक ठाकूर (अयोध्यानगर, जळगाव ) ७२७६७ ९५५१० 
राहुल सोनवणे (जळगाव), ९२७००७६५७८ 
बबलू शिंदे (पिंप्राळा, जळगाव) ९६६५००७६४७ 
अमन गुजर (जळगाव) ९७६७२५१२३४ 
ऋषी राजपूत (जळगाव) ८९८३८३५२५३ 
सतीश जवळकर (जळगाव) ९७६६३२७३३३ 
दुर्गेश आंबेकर (रिंगरोड, जळगाव) ८८३०१९६०४३ 
सतीश कांबळे (भुसावळ ) ८०५५६७२५२९ 
अलेक्झांडर प्रेसडी (भुसावळ) ९९२३२२११३२ 
स्कायलेब डिसुझा (भुसावळ) ९६३७७४३९०० 
गौरव शिंदे ( भुसावळ)९५४५०५५६०९ 
दीपक नाटेकर (भुसावळ) ९७६५२५४५१५ 
प्रदीप शेळके ( चिंचोली, गाडेगाव ) ९७६६८७२४६६ 
विनोद सोनवणे ( चिंचोली, उमाळा) ९०४९०६३०१८ 
हिम्मत सपकाळे (धामणगाव) ७०३८३२८००७ 
योगेश सपकाळे (कानळदा) ९५४५१०५००७ 
रितेश सपकाळे ( रिधुर) ८८८८५०९२४२ 
दिनेश सपकाळे ( कानळदा ) ७७ ९८१४१८७७ 
गणेश सपकाळे ( पाळधी, धरणगाव) ७०६६७५७३७८ 
अजय सूर्यवंशी (पाळधी ) ८१४९८५११९१ 
सागर खेडकर (चाळीसगाव) ९६२३९४८७५७ 
शेखर पाटील (मुक्ताईनगर) ७५५९१११९१९ 
विनोद सोनवणे (कंडारी ) ९०४९०६३०१८ 
सोनू भोई (नशिराबाद) ९५६१११०६१६ 
तुषार रंधे ( नशिराबाद) ९९६०७१८१४० 
शशिकांत सपकाळे( खर्डी, ता चोपडा) ९१३०२०५५४७ 
कुशल अग्रवाल (चोपडा) ९२७०४९७६१७ 
रितेश सपकाळे ( धानोरा) ९३५९९१७७३७ 
हर्षद पाथरकर (पाचोरा) ७८७५०९३८११ 
नीलेश भुईकर (पाचोरा) ८३२९४५७८११ 
गणेश सोनवणे (पाचोरा) ७०६६९०९०४६ 
सागर पाटील (बाळद) ९८९०३१३७८८ 
विजय कंडारे (भडगाव) ८६००१३५५९९ 
सागर चौधरी (पाचोरा) ७८७५०९३८११ 
सागर सोनार (लोहारा, पाचोरा) ७८७५१०८६०८ 
गौरव पाटील (यावल) ७८४१८२३५७७ 
वैभव बच्छाव (बोदवड) ९९२३२४८२९६ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Snakes are coming out of the burrows