वरणगावला गुरे कत्तलासाठी पाठविणाऱया गोठ्यावर पोलिसांचा छापा !

विनोद सुरवाडे
Saturday, 19 September 2020

पाच लाख ,दहा हजार किमतीचे 34 गोवंश जातीचे गुरे निर्दयी पणे बांधून ठेवलेले होते आणि सदर गोऱ्हे हे कत्तलीसाठी नेण्यात येणार होते. 

वरणगाव (ता. भुसावळ ) : वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत पाच लाख रुपये किंमतीची कत्तलीसाठी नेण्यात येत असलेली गुरे जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेशन पथक जळगाव येथील पोलिस अधिकारी बापू रोहम यांनी गुप्त माहितीच्या आधारे प्रतिभा नगरातील निर्जन ठिकाणी छापा टाकून 34 गोवंशातील गुरे ताब्यात घेतले असुन गुरांना गोशाळेत रवाना केल्याची घटना नुकतीच घडली आहे सदरील तपास वरणगाव पोलिसांकडे देण्यात आला असुन तपासाचे काम सुरू आहे

वरणगाव मधील प्रतिभा नगर भागात एका गोठ्यात कत्तलीसाठी गोवंशजातीचे गुरे ठेवले असल्याची गुप्त माहिती जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलिस अधिकारी बापू रोहम यांना मिळाली होती या आधारे जळगावचे पोलीस पथकातील राजेश मेढे, संजय हिवरकर, शरद भालेराव , निजामुद्दीन शेख , संजय सपकाळे , सुरज पाटील, किरण धनगर आदींनी या ठिकाणी छापा टाकून प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर घटना सत्य असल्याचे आढळले यावेळी वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिपकुमार बोरसे ,पोलीस कॉन्स्टेबल मनोहर पाटील ,सहायक फौजदार सुनील वाणी, पोलीस हेडकॉन्स्टेबल पठाण ,योगेश जोशी ,राजेंद्र सोनार आदी यावेळी घटनास्थळी उपस्थित राहण्याचे आदेश करण्यात आले होते.

गोठ्यात गुरांना निर्दयी पणे बांधलेले 

पाच लाख ,दहा हजार किमतीचे 34 गोवंश जातीचे गुरे निर्दयी पणे बांधून ठेवलेले होते आणि सदर गोऱ्हे हे कत्तलीसाठी नेण्यात येणार होते सदरचा गोठा शेख मुकिम शेख यासीन राणा प्रतिभानगर यांच्या मालकीचा असुन याप्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल येवले यांच्या फिर्यादीनुसार विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरील घटनेचा तपास पोलिस निरिक्षक हर्षल भोये , पोहे कॉ, मजहर पठाण करीत आहे. 
 

वरणगाव परिसरात यापूर्वीसुद्धा गोवंशांची कत्तलीसाठी ने -आण करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून जळगाव शाखे कडून 3ते 4 वेळा छापा टाकून कारवाईच्या घटना घडलेल्या आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news varangaon Police action on cattle sheds being sent for slaughter