
यावल: काळ्या बाजारात जाणारा तांदळाचा ट्रक जप्त
यावल : कापडणे- चोपडा- यावलमार्गे गोंदिया येथे काळ्या बाजारात जाणारा शासकीय रेशनिंगचा ३० टन तांदूळ (Government rationing Rice) यावल पोलिसांनी (Police) पकडून ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात ट्रकचालकासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा: यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी ६३ मुहूर्त
शासनाचा शिधापत्रिकेवर वितरित होणारा तांदूळ काळ्या बाजारात जास्त दराने विक्री करणारा ट्रक चोपडा-यावलमार्गे गोंदिया येथे जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. त्यावरून सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान समशेर खान, हवालदार अस्लम खान, सुशील घुगे, चालक रोहिल गणेश आदींनी यावल-चोपडा रोडवरील हॉटेल केसर बागजवळ तपासणीसाठी थांबले. दुपारी तीनच्या सुमारास तांदळाने भरलेला ट्रक (एमएच १८, एसी ८४७) येताना दिसून आला. पोलिसांनी ट्रकला थांबवून तपासणी केली असता, त्यात पाच लाख ८८ हजार रुपयांचा रेशनिंगच्या तांदूळ आढळून आला. याबाबत ट्रकचालकाने उडवाउडवीचे उत्तर दिली. त्याची कसून चौकशी केली असता, हा तांदूळ पंकज मुरलीधर वाणी (रा. चोपडा) यांच्या सांगण्यावरून संतोष प्रभाकर वाणी, नीलेश राजेंद्र जैन (रा. कापडणे, ता. जि. धुळे ) यांच्या कापडणे येथील गुदाममधून ३० टन तांदूळ भरून भंडारा येथील गीतिका पराबोलिक इंडस्ट्रीज येथे जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. ट्रकचालक केदार मुरलीधर गुरव (वय ३८, रा. आकाश गार्डनसमोर, शहादा रोड, शिरपूर) याला ताब्यात घेतले.
हेही वाचा: जळगावकरांची दिवाळीही खड्ड्यात!
दरम्यान, पोलिसांनी कापडणे येथील कल्याणी विनायक इंडस्ट्रीजच्या गुदामाला भेट दिली. तेथे शासनातर्फे परण्यात येणारे बारदान आढळून आले. आतापर्यंत दोन महिन्यांत १७० टन तांदूळ काळ्या बाजारात विक्री केला असल्याची माहिती समोर आली आहे. सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान समशेर खान यांच्या फिर्यादीवरून पंकज मुरलीधर वाणी, नीलेश जैन, संतोष पाटील आणि केदार गुरव यांच्याविरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर पाटील तपास करीत आहेत.
Web Title: Marathi News Yaval Government Rationing Rice Black Market Truck Seized By Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..