मळ्यात बिबट्या दिसताच शेतकऱ्यांचा उडाला थरकाप; मात्र तो होता तळस  

मळ्यात बिबट्या दिसताच शेतकऱ्यांचा उडाला थरकाप; मात्र तो होता तळस  
Updated on

यावल: रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी वीज कंपनीच्या भारनियमनामुळे रात्री अपरात्री शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांना आता जंगली श्वापदांचा त्रास उद्भवू लागला आहे.यावल येथील जुन्या अट्रावल मार्गावरील एका मळयात बिबट्या दिसल्याने परिसरात शेतकऱ्यांची एकच धावपळ झाल्याचे वृत्त हाती आले आहे.

यावल भुसावळ मार्गावरील कोनतोडी नाल्याच्या काठावर बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास जुना अट्रावल मार्गावरील शांताबाई नेमाडे यांच्या नवतीच्या मळ्यात हरभऱ्याला पाणी देत असतांना शेती करणारे जितेन्द्र देशमुख यांना शेतात बिबट्या वावरतांना दिसला. देशमुख यांना बिबट्या दिसतात त्यांची दाणादाण उडाली आणी त्यांनी तत्काळ भुसावळ मार्गावरील एका हॉटेलचे संचालक कदीर खान यांना दुरध्वनीवरून संपर्क साधुन माहिती देत मळयातुन सुरक्षितपणे बाहेर काढण्याची विंनती केली .

चारचाकी वाहनाने तत्काळ मळ्यात

कदीर खान यांनी आपले मित्र शेरखान व जुल्फेकार खान जाबीर खान यांनी तत्काळ चारचाकी वाहनाने मळयात धाव घेत, जितेंद्र देशमुख यांना आपल्या गाडी बसवुन सुरक्षित बाहेर काढले.

इतरांना ही केले सावधान

त्यांनी मिळेल त्या पद्धतीने त्या मळया जवळच्या शेतात काम करणाऱ्या लोकांना माहीती देवुन सावधान केले आहे . या परिसरातील शेतातील विद्युत पुरवठ्याचे रात्रीचे भारनियन असल्याने शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. 

बिबट्या नव्हे तो होता तडस

घटना घडल्यानंतर गुरूवारी याबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. गुरूवारी वनविभागाच्या अधिका्रऱयांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत बिबट्या नसून तडस असल्याचे सांगितले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com