esakal | कर्नाटक राज्यातील लुट प्रकारणाचे कनेक्शन यावल शहरात
sakal

बोलून बातमी शोधा

crime

कर्नाटक राज्यातील लुट प्रकारणाचे कनेक्शन यावल शहरात

sakal_logo
By
राजू कवडीवाले

यावल: कर्नाटक राज्यातील लूट (Robbery) प्रकरणचे यावल कनेक्शन समोर आले असुन गुरूवारी कर्नाटक पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या (Police) मदतीने तालुक्यातील शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या मुलास ताब्यात घेतले. त्यांच्या घरात आश्रयास असलेला एक संशयित फरार झाला आहे. तसेच या प्रकरणी एक शासकिय कर्मचारी तरूणी मोबाईलमुळे (Mobile) अडचणी आली आहे. तेव्हा या तरूणीस कर्नाटक पोलिसात (Karnataka Police) हजर राहण्याची समज देण्यात आली असुन यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: अनाथ झालेल्या मुलांच्या मागे शासन खंबीरपणे उभे-मंत्री पाटील


गेल्या २२ सप्टेंबरला कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील शांतापूर पोलीस स्टेशन हद्दीत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका व्यापाऱ्याचे सहा लाख रुपये लुटले होते व ते फरार झाले होते. या प्रकरणात तीन संशयितांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती. त्यातील दोन संशयित हे यावल शहरात असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळाली होती. व हे संशयीत एका तरुणीच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले होते. तेव्हा गुरूवारी पहाटे पुर्वी कर्नाटक पोलिस पथक यावलला आले. पोलिस निरिक्षक सुधीर पाटील, सुशील घुगे, राजेश वाढे, भुषण चव्हाण, राहुल चौधरी, अशोक बाविस्कर यांनी संबधीत तरूणीचा शोध घेतला असता ती तरूणी वाघझिरा आश्रमशाळेत अधिक्षक पदावर असल्याचे समजले.

एक संशयीत फरार..

विचारपूस करीता पोलिसांनी संपर्क केला असता तरुणी बसस्थानकावर होती. सोबत संशयीत आदित्य सत्यवान पवार हा तरूण देखील होता. व हाचं तरूण कर्नाटक पोलिसांना हवा होता. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. व गुन्ह्यातील संशयीत शिवकुमार हा पवार यांच्या घरी आश्रमयास होता. संशयितास ताब्यात घेण्या करीता पोलिस पथक शहरातील हरिओम नगरात गेले असता पोलिसांचे गाड्या पाहून संशयीत शिवकुमार हा तेथुन फरार झाला. त्यांचा शोध पोलिस घेत असुन संशयीत आदित्य पवार यास कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संशयीत तरुणीला शांतापुर पोलिस ठाण्यात हजर राहण्याची समज दिला आहे. कर्नाटक लुट प्रकरणात यावल कनेक्शन मुळे शहरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: भारतातील ही आहेत सुंदर 10 बीच..येथे नक्की भेट द्या!


शासकीय नोकर तरूणी अडचणीत..
संशयीत आदित्य पवार हा यावल प्रकल्प कार्यालयातील ग्रंथपाल सत्यवान पवार यांचा मुलगा आहे. ते मुळचे सोलापूरचे आहे. कर्नाटक पोलिसांनी केलेल्या तपासात आदित्य पवार याने संशयीत तरुणीचा मोबाईल गुन्ह्यात वापरला होता. व तिच्या फोन पे वर ५० हजारांची रक्कम देखील टाकली आहे. त्यामुळे लूट प्रकरणी तरुणी ही संशयाच्या फेऱ्यात आहेत.

loading image
go to top