आईच्या मृत्यूचे दुःख नाही...त्यांना हवेत मृतदेहावरील दागिने; भावांची मारामारी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

मातेच्या मृत्यूचे दुख: न बाळगता, आईच्या अंगावरील दागिण्यांवर दोघा मुलांचा डोळा होता. हे दागिणे घेण्यावरुन निधनाच्या तिसऱ्या दिवसशीच रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास दोघा भावांमध्ये शाब्दीक चकमक व वादविवाद झाले.

यावल : जन्मदात्या आईच्या चितेची राख थंड होत नाही तोवर, मृत आईच्या अंगावरील दागिण्यांवरुन दोघा भावांमध्ये तुंबळ हाणामारीची निंदणीय घटना सांगवी खुर्द (ता. यावल) येथे घडली. याबाबत यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवी खुर्द (ता. यावल) येथील कुसुमबाई तायडे यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. मात्र, आपल्या मातेच्या मृत्यूचे दुख: न बाळगता, आईच्या अंगावरील दागिण्यांवर दोघा मुलांचा डोळा होता. हे दागिणे घेण्यावरुन निधनाच्या तिसऱ्या दिवसशीच (ता. २) रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास अशोक मुरलीधर तायडे यांची आत्या जनाबाई एकनाथ गाडे यांच्या घरासमोर अशोक मुरलीधर तायडे व शंकर मुरलीधर तायडे या दोघा भावांमध्ये वाद झाला. यावेळी शंकर तायडे व त्यांचा आतेभाऊ गजानन एकनाथ गाडे (रा.सांगवी खुर्द ता. यावल) यांच्यात शाब्दीक चकमक व वादविवाद झाले. यानंतर झालेल्या वादात शंकर तायडे व गजानन गाडे यांनी दोघांनी मिळुन अशोक तायडे यांना लोखंडी डंबेल्सने कपाळावर, पाठीवर आणि उजव्या हातावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. जखमी अशोक तायडे हा बँकिंग एजंट म्हणून काम करतो. तर शंकर तायडे हा सैन्यदलात कार्यरत आहे. याबाबत अशोक मुरलीधर तायडे यांनी यावल पोलिसात फिर्याद दाखल केली असुन, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

आतेभावाच्या फूसवरुन बेबनाव
अशोक व शंकर तायडे यांची आई कुसुमबाई तायडे यांचे अंगावरील दागिने दोघं भाऊ वाटणी करुन घेऊ, असा अशोक तायडे यांचा प्रस्ताव, तर सर्व दागिने आत्या जनाबाई गाडे यांना देण्याबाबत शंकर तायडे यांचा प्रस्ताव होता. त्यावरूनच अशोक व शंकर मध्ये बेबनाव झाला. यांस गजानन गाडे हाच जबाबदार असल्याचा अशोक तायडे यांचा संशय आहे. यातूनच २ जूनला अशोक तायडे यांस हाणामारी केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news yawal mother death and two brother heating mother jwellry

Tags
टॉपिकस
Topic Tags: