Marathi Sahitya Sammelan: साहित्य संमेलनाआधीच राजकीय ‘कलगीतुरा’; स्वागताध्यक्ष निवडीवरून रंगले मानापमान नाट्य

Girish Mahajan
Anil Patil
Gulabrao Patil
Girish Mahajan Anil Patil Gulabrao Patilesakal

आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा

Marathi Sahitya Sammelan : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारीला अमळनेर शहरात होत आहे. संमेलनाच्या अंतिम टप्प्याची तयारी आता सुरू झाली आहे. मात्र, त्याआधीच संमेलनाच्या अनुषंगाने नाराजी नाट्याला सुरवात झाल्याची जोरदार चर्चा जोर धरू लागली. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, राज्याच्या मंत्रिमंडळातील स्थानिक कॅबिनेट मंत्र्यांना डावलून मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविलेली स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी.

गिरीश महाजन यांनी संमेलनाच्या नियोजित जागेवर जाऊन रविवारी (ता. २४) तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे संमेलनस्थळापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर एका खासगी कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र, तरीदेखील ते पाहणी दौऱ्याला अनुपस्थित राहिले. (Marathi Sahitya Sammelan politics was played over election of welcome president jalgaon news)

त्यामुळे नाराजी नाट्याच्या चर्चेने अधिक जोर धरला. त्यात, श्री. महाजन हे पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांच्यासोबत साहित्यिक कमी आणि कार्यकर्त्यांची गर्दी अधिक असल्याने जणू पक्षाचा पाहणी कार्यक्रम वाटत असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत.

अनिल पाटील हे स्थानिक आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री असल्याने संमेलनाच्या घोषणेपासून ते सर्व आयोजनात हिरिरीने सहभाग नोंदवीत आहेत. संमेलनाला सरकारकडून दोन कोटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी त्यांनी सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, स्थानिक मंत्री असताना त्यांना डावलून गिरीश महाजन यांच्याकडे स्वागताध्यक्षाची धुरा सोपवल्याने अनिल पाटील यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

वास्तविक, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे जरी स्वागताध्यक्षपद सोपविले असते, तरी ते संयुक्तिक ठरले असते, अशा प्रतिक्रिया साहित्यिक क्षेत्रात व्यक्त केल्या जात आहेत. विशेष म्हणजे, गिरीश महाजन हे मंत्री असले तरी जळगाव जिल्ह्याशी संबंधित मोठी सरकारी जबाबदारी त्यांच्याकडे नाही. त्यामुळे कुठेतरी साहित्यिक क्षेत्रात राजकीय वास येत असल्याची चर्चा सध्या अमळनेर परिसरासह जिल्ह्यामध्ये जोर धरत आहे.

गेल्या ५ वर्षांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष जबाबदारीकडे नजर टाकली असता, स्थानिक मंत्र्यांना हा मान मिळाल्याचे दिसून येते. त्यामुळे आगामी काळात संमेलनाच्या नाराजी नाट्यावर पडदा पडतो, की पुन्हा एखादे नवे नाट्य उभे राहते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Girish Mahajan
Anil Patil
Gulabrao Patil
Marathi Sahitya Sammelan : अमळनेरात तब्बल 72 वर्षांनी भरणार साहित्याचा मेळा!

संमेलन क्रमांक वर्ष ठिकाण आणि स्वागताध्यक्षपद

९२ वे २०१९ यवतमाळ- मदन येरावार (मंत्री)

९३ वे २०२० उस्मानाबाद- नितीन तावडे (साहित्य संमेलनाच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष)

९४ वे २०२१ नाशिक- छगन भुजबळ (पालकमंत्री)

९५ वे २०२२ उदगीर-संजय बनसोडे (मंत्री)

९६ वे २०२३ वर्धा-दत्ता मेघे (माजी खासदार)

"मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील हे स्थानिक आमदार आणि सरकारमधील कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांना हा मान मिळायला हवा होता. ७३ वर्षांनी हे संमेलन अमळनेरमध्ये होत असल्याने हा अमळनेरकरांसाठी अविस्मरणीय कार्यक्रम असून हा मान स्थानिकांना मिळायला हवा होता." - भागवत पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अमळनेर

"गिरीश महाजन हे सरकारमध्ये आणि जिल्ह्यातील ज्येष्ठमंत्री आहेत. तसेच त्यांना नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळावा आणि इतर कार्यक्रमांचा अनुभव असल्याने व मंत्री अनिल पाटील यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील चर्चेने त्यांना स्वागताध्यक्षपद दिले गेले असावे, असे मला वाटते." - हिरालाल पाटील, तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, अमळनेर

"जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांच्या समन्वयातून स्वागताध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन, निमंत्रकपदी मंत्री अनिल पाटील, तर संरक्षकपदी पालकमंत्री गुलाबराव पाटील व अशोक जैन यांची निवड करण्यात आली आहे." - डॉ. अविनाश जोशी, अध्यक्ष, मराठी वाड्ःमय मंडळ, अमळनेर

Girish Mahajan
Anil Patil
Gulabrao Patil
Girish Mahajan: कुणबी म्हणून सरसकट आरक्षण देता येणार नाही : ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com